Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal: निवडणुकीपूर्वी केजरीवालांना अटक का? कोर्टाने ईडीला विचारले हे 5 प्रश्न

Supreme Court News: दिल्लेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी यासंदर्भात ईडीला अनेक प्रश्न विचारले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Arvind Kejriwal News:

दिल्लेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी यासंदर्भात ईडीला अनेक प्रश्न विचारले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांना अटक का करण्यात आली, असा सवाल न्यायालयाने ईडीला विचारला. तपास आणि अटक यात एवढे मोठे अंतर का, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 मे रोजी होणार असून त्यात ईडी या प्रश्नांची उत्तरे देणार आहे.

या प्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटलं आहे की, जीवन आणि स्वातंत्र्य हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. दरम्यान, 21 मार्च रोजी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. कथीत दिल्ली दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप त्यांच्यावर आहे. या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

न्यायालयाने ईडीला विचारले हे महत्त्वाचे प्रश्न

न्यायालयाने ईडीला विचारलं आहे की, केजरीवाल यांना सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच अटक का करण्यात आली? न्यायालयीन कार्यवाहीशिवाय फौजदारी कारवाई सुरू करता येते का? या प्रकरणी अद्याप कोणतीही संलग्नता कारवाई करण्यात आलेली नाही आणि केलीच असेल तर दाखवा की, या प्रकरणात केजरीवालांचा कसा सहभाग आहे? हे प्रकरण मनीष सिसोदिया प्रकरणापेक्षा वेगळे कसे? या प्रकरणातील कलम 19 ची मर्यादा स्पष्ट करा?

पुढील सुनावणीत ईडीला मांडणार आपली बाजू

अटकेला आव्हान देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर शुक्रवारीही सुनावणी सुरू राहणार आहे. आज केजरीवाल यांचे वकील सिंघवी यांनी याप्रकरणी युक्तवाद करताना केजरीवाल यांची बाजू मांडताना संजय सिंह सारखेच हे प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. तसेच न्यायालयाने त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महानगरपालिकेच्या वेळेस राष्ट्रवादी बरोबर युती करणं हा चुकीचा निर्णय; सपकाळ

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT