South Mumbai Lok Sabha:
एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत असलेल्या दक्षिण मुंबईमधून अखेर महायुतीचा उमेदवार ठरला आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिंदे गटाकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली जाईल, याबाबतची बातमी 'साम टीव्ही'ने आधीच दिली होती. अखेर आज साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबई जागा नेमकी कोणाला मिळणार यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु होती. मात्र आज शिंदे गटाकडून अधिकृतपणे यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच जागेवरून भाजपचे अनेक नेते इच्छुक होते. यामधीलच एक नाव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं आहे.
राहुल नार्वेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघात फिरत आहेत. ते अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. यामध्येच त्यांनी अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांचीही भेट घेतली होती. तसेच त्यांनी अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित देखील केलं होतं. एकंदरीतच त्यांनी या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी सुरु केली होती. मात्र आज येथून शिंदे गटाचा उमेदवार जाहीर झाला आहे.
यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार आहेत. याआधी त्यांनी मुंबई महापालिका नगरसेवक म्हणूनही काम केलं आहे. त्या बीएमसी बाजार उद्यान समितीच्या अध्यक्षही राहिल्या आहेत. त्याने पती यशवंत जाधव हे देखील शिंदे गटात आहेत. मुंबई महानगरपालिकेत ते शिवसेनेचे गट नेतेही होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.