Dhananjay Mahadik : कोल्हापुरात राजकीय आखाडा तापला; भर सभेत धनंजय महाडिक सतेज पाटील यांच्यावर बरसले

Dhananjay Mahadik on Satej patil : कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सभेत भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
Dhananjay Mahadik vs satej patil
Dhananjay Mahadik vs satej patil Saam tv

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : देशासहित कोल्हापुरातही लोकसभा निवडणुकीची वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सभेत भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

'दुसरीकडे गेलं तर त्यांचं चारित्र्यहनन करायचं ही त्यांची पद्धत. म्हणजे दुसऱ्याचा चेहरा काळा करायचा की शेजारचा गोरा वाटला पाहिजे, अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे.

Dhananjay Mahadik vs satej patil
Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

धनंजय महाडिक यांच्या भाषणातील मुद्दे

सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांचा अपप्रचार सुरू केलेला आहे.

सतेज पाटील हे संजय मंडलिक यांना कृतघ्न म्हणत आहेत. उमेदवारी जाहीर होण्याअगोदर संजय मंडलिक यांच्या सोबत त्यांचे अनेक जाहीर कार्यक्रम सुरू होते.

32 कोटी रुपयांच्या निधींचा उद्घाटन ही त्यांनी मंडलिक यांच्यासोबत केले, त्यावेळी संजय मंडलिक हे कार्यक्षम होते आणि आता हे महायुतीचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर ते कृतघ्न कसे झाले? ही सतेज पाटील यांची स्टाईल आहे जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत चांगला..

दुसरीकडे गेलं तर त्यांचं चारित्र्यहनन करायचं ही त्यांची पद्धत आहे. दुसऱ्याचा चेहरा इतका काळा करायचा की शेजारचा गोरा वाटला पाहिजे. महादेवराव महाडिक यांचा मानसपुत्र म्हणून त्यांनी राजकारणात सुरुवात केली. कारण त्यांना दिग्विजय खानविलकर यांचा पराभव करायचा होता.

त्यानंतर ते महाडकांविरोधातच उभे राहिले जिल्ह्यातील सत्ता त्यांना हातात घ्यायच्या होत्या. विरोधात कोणी गेलं तर त्यांच्या विरोधात राहायचं ही त्यांची पद्धत आहे.

जोपर्यंत आपला स्वार्थ आहे, तोपर्यंत त्या व्यक्तीला वापरून घ्यायचं. वापरा आणि फेका ही त्यांची पॉलिसी आहे. या निवडणुकीत ही त्यांचा स्वार्थ पाहायला मिळतोय.

विधान परिषदेच्या वेळी देखील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विनय कोरे यांना मध्यस्थी करून त्यांनी फडणवीस यांना शब्द दिला की राजाराम कारखान्याची निवडणूक लढवणार नाही. पण निवडून आल्यानंतर त्यांनी राजाराम कारखान्यात पॅनल उभं केलं.

वाईट गोष्टी बोलायच्या, चारित्र्यहनन करायचं, निंदा नालस्ती करायची हा त्यांच्या स्वभावाचा गुण आहे. राजाराम कारखान्यांच्या निवडणुकीतच जिल्ह्यातल्या लोकांना लक्षात आलं की, सतेज पाटील लबाड आहे म्हणून सभासदांनी त्यांना दणका दिला.

2019 साली महायुतीला कौल दिला, शिवसेना-भाजपचं सरकार येणार अशी परिस्थिती होती. मात्र उद्धव ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला.

महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर पालकमंत्रीपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळी हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूरवर दावा होता.

Dhananjay Mahadik vs satej patil
Nashik Election: मोठी बातमी! महंत अनिकेत शास्त्री BJPकडून लोकसभा लढवणार? शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया 'साम'वर EXCLUSIVE

कारण ते 5 वेळा आमदार झालेले आहेत, मात्र मुश्रीफ यांना वेगळ्या जिल्ह्यात पाठवलं. सतेज पाटील यांनी दिल्लीपर्यंत जाऊन मुश्रीफांचा येथील दावा हाणून पाडला. स्वतः येथील पालकमंत्रीपद घेतलं.

मुश्रीफ यांचा हक्क हिसकावून घेण्याचे काम सतेज पाटील यांनी घेतलं. आता त्याचा बदला आपण घेतला पाहिजे. याचा हिसका त्यांना दाखवला पाहिजे. कागलची जनता मुश्रीफांच्या अपमानाचा बदला घेईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com