फरीदाबादमधील डॉक्टर मुजम्मिल शकिलच्या ताब्यातून 2,563 किलो स्फोटके जप्त.
शकीलचा जैश-ए-मोहम्मद संघटनेशी थेट संबंध उघड.
महिला डॉक्टरच्या कारमधून असॉल्ट रायफल आणि पिस्तूल सापडले.
जम्मू–काश्मीर व हरियाणा पोलिसांची संयुक्त कारवाई.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्काराने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला होता. यानंतर पुन्हा एकदा दहशतवादी संघटना भारताला लक्ष करत असल्याचे समोर येत आहे. पुणे येथे देखील काही दिवसांपूर्वी एटीएसने मोठी कारवाई करत एका इंजिनियरला अटक केली होती. तसेच त्याच्याकडील असलेल्या लॅपटॉपमध्ये देखील देशात मोठा कट आखला जात असल्याचे समोर आले होते. सोमावरी देखील गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने देशात एरंडीच्या बियांपासून तयार केलेल्या रिसीन नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा एक कट उधळून लावला.
अशातच आता हरियाणामधील फरीदाबाद शहरात एका डॉक्टरकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके सापडल्याने तपास यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती एक मोठा पुरावा हाती लागला आहे. एका महिला डॉक्टरच्या कारमधून एक असाॅल्ट रायफल, एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही कार फरीदाबादच्या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ. मुझ्झम्मिल शकीलच्या एका सहकाऱ्याच्या नावावर आहे.
डॉ. शकीलची पोलिसांनी कारची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कारची झडती घेतली. या चौकशीदरम्यान शकीलने एका भाड्याच्या खोलीची माहिती दिली.ज्यामध्ये 360 किलो स्फोटके, 20 टायमर आणि इतर संशयास्पद वस्तु जप्त करण्यात आल्या. सदर करवाई जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी केली. या संयुक्त कारवाईत अल-फलाल स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉक्टर मुजम्मिल शकीलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शकील हा पुलवामाचा रहिवासी असून तो युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये राहत होता. त्याची चौकशी सुरू असतानाच तपास यंत्रणांना त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अल-फलाल युनिव्हार्सिटीमध्ये काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या नावावर असलेल्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारची तपासणी केली असता. यामध्ये क्रिंकोव्हा असाॅल्ट रायफल (एके-47) पिस्तूल, तीन मॅगाझिनसह 83 जिवंत राऊंड आणि 8 जिवंत राऊंड असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहेत. पोलिस तपासात सामोर आलेल्या माहितीमध्ये डॉक्टर मुजम्मिल याचे थेट जैश- मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठोस पुरावा यंत्रणांना मिळाला आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी शकीलच्या दुसऱ्या घरातून २,५६३ किलोग्रॅम स्फोटके जप्त केली आहेत. डॉ. मुजमिल शकील याने भाड्याने घेतलेले हे घर धोजपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या फतेहपूर टागा गावात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जप्त केलेले साहित्य अमोनियम नायट्रेट असण्याची शक्यता आहे. फरिदाबाद आणि जम्मू-काश्मीर पोलिस आज सकाळपासूनच घरावर छापे टाकत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.