विद्यार्थ्याचं हैवानी कृत्य; ४० वर्षीय महिलेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न, नकार देताच डोक्यात विळा घातला

Minors Brutal Attack Leaves Woman Dead in the Field: नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून ४० वर्षीय महिलेवर अत्याचार. विरोध होताच महिलेवर विळ्याने वार.
Minor’s Brutal Attack Leaves Woman Dead in the Field
Minor’s Brutal Attack Leaves Woman Dead in the FieldSaam Tv
Published On
Summary
  • हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर.

  • १४ वर्षीय विद्यार्थ्याकडून महिलेवर जबरदस्ती अन् हल्ला.

  • आरोपी अटकेत.

हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सासन गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलानं शेतात काम करणाऱ्या महिलेवर विळा आणि काठीनं हल्ला केला. अल्पवयीन मुलानं आधी महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेनं विरोध केल्यानंतर आरोपी मुलानं तिच्यावर वार केले. या भीषण हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून, त्याला उना येथील निरीक्षण गृहात पाठवलं आहे.

नेमकं घडलं काय?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा १४ वर्षांचा असून, तो इयत्ता नववी वर्गात शिकत आहे. त्यानं शेतात जाऊन महिलेवर जबरदस्ती केली. महिलेनं प्रतिकार केला. तिनं आरोपी मुलाच्या कृत्याचा विरोध केला. विरोध करताच अल्पवयीन मुलाला राग अनावर झाला. त्यानं रागाच्या भरात महिलेवर विळा आणि काठीने हल्ला केला.

Minor’s Brutal Attack Leaves Woman Dead in the Field
शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, मुंडेंवर आरोप करत सगळंच बाहेर काढलं

या हल्ल्यात महिला गंभीररित्या जखमी झाली. मुलानं घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. गावकऱ्यांना गंभीर अवस्थेत महिला दिसली. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला खासगी रूग्णालयात पाठवलं. तिची प्रकृती अधिक गंभीर होत गेली.

तिला तातडीने दुसऱ्या खासगी रूग्णालयात रेफर करण्यात आलं. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपास करीत पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. तसेच त्याला उना येथील निरीक्षण गृहात पाठवलं. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

Minor’s Brutal Attack Leaves Woman Dead in the Field
जबरदस्ती शारीरिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात; इरफाननं ओळख लपवून तरूणींना फसवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com