Vasundara Raje-Shivraj Chouhan Explainer Saam Tv
देश विदेश

Vasundara Raje-Shivraj Chouhan Explainer: राजस्थान, मध्य प्रदेशातील धक्कातंत्रानंतर वसुंधरा राजे- शिवराज सिंह यांचे काय होणार?

Vasundara Raje-ShivrajChouhan : भाजपचे शिवजराज सिंह चौहान चार वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले. तर वसुंधरा राजे या राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. मात्र या दोन्ही दिग्गज नेत्यांचं आता काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shivraj Singh Chouhan-Vasundhara Raje Political Explainer:

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काही दिवसांपूर्वीच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये ३ राज्यांत भाजपने विजय मिळवला आहे. त्यानंतर भाजपने तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावे देखील जाहीर केली. छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साई, मध्यप्रदेशमध्ये मोहन यादव तर राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असल्याने आता भाजपच्या जुन्या नेत्यांचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

भाजपचे शिवजराज सिंह चौहान चार वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले. तर वसुंधरा राजे या राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. मात्र या दोन्ही दिग्गज नेत्यांचं आता काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात भाजपच्या नेतृत्वासाठी वसुंधरा राजे आणि शिवराज सिंह चौहान आणि डॉ. रमणसिंह यांची निवड केली होती. या तिन्ही नेत्यांनी आपल्या राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, आता काळ बदलला असून मोदी-शाहांच्या काळात या तिन्ही नेत्यांना मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्या नवीन नेत्याच्या नावाचा प्रस्ताव ठेवावा लागला. त्यामुळे आता या नेत्यांचे राजकारण संपुष्टात येणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

वसुंधरा राजे आणि शिवराज सिंह यांची भूमिका अस्पष्ट

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याकडे विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, वसुंधरा राजे आणि शिवराज सिंह चौहान यांच्या राजकीय भवितव्याचे चित्र असपष्ट आहे. दोन्ही नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही याबाबत भाजपने कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही.

शिवराज सिंह आणि वसुंधरा राजे खूप वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये राजकीय वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असून या नेत्यांकडे दुर्लक्ष करुन भाजपला चालणार नाही. या परिस्थितीत या दोन्ही नेत्यांकडे केंद्र सरकारमध्ये नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात किंवा पक्ष संघटनेत विशिष्ट जबाबदारी दिली जाऊ शकते.

वसुंधरा राजे आणि शिवराज सिंह चौहान यांना पक्षाकडून केंद्रात येण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही. त्यांनी राज्याच्या राजकारणात राहण्याचा निर्णय घेतला होता. २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर वसुंधरा राजे आणि शिवराज सिंह चौहान यांना राष्ट्रीय टीममध्ये जागा देण्यात आली होती.

जुन्या चेहऱ्यांच्या जागी नवे चेहरे

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नव्या चेहऱ्यांनी संधी देण्यास सुरुवात केली. अशातही वसुंधरा राजे यांनी राजस्थानमध्ये आपली राजकीय पकड मजबूत ठेवली आणि बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा मिळवला. याचप्रकारे शिवराज सिंह चौहान यांनी देखील मध्य प्रदेशमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले. परंतु २०२३ च्या निवडणुकीत सर्व समीकरणे बदलली आहेत.

भाजपने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाच्या नवीन चेहऱ्यांची नावे जाहीर केली नव्हती. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि कामावर निवडणूक लढवली. तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. तिन्ही राज्यात भाजपचे सरकार आले. या राज्यांत जुन्या चेहऱ्यांऐवजी नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

केंद्रात वसुंधरा राजे जाणार का?

वसुंधरा राजे सध्या झालरापाटनच्या आमदार आहेत आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. राजस्थानात त्यांच्या जागी दुसरे कुणीतरी आपले स्थान निर्माण करणे अवघड दिसत आहे. याचसोबत वसुंधरा राजे यांचे कुटुंबदेखील राजकारणात सक्रिय आहे. वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत हे खासदार आहेत.

पक्ष त्यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी देऊ शकतो. किंवा वसुंधरा राजे २०२४ मध्ये केंद्र सरकारमध्ये सामील करण्यासाठी त्यांच्या मुलाच्या जागी निवडणूक लढवतील. तर दुष्यंत सिंह यांना पोटनिवडणुकीद्वारे विधानसभेत पाठवण्यात येईल. त्याचसोबत त्यांना राज्यपाल बनण्याचीही संधी दिली जाऊ शकते. कारण याआधीही भाजपने वरिष्ठ नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली होती.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या भविष्याबाबत अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहेत. त्यांचा केंद्रीय मंत्रिपदापासून ते भाजपच्या संघटनेमध्ये समावेश केला जाऊ शकतो. अशातच शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभा निवडणुका लढण्याच्या प्रश्नांना फेटाळून लावत दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. पक्ष जो काही निर्णय घेईन त्याचे मी पालन करेन, असं शिवराज सिंह यांनी म्हटलंय. त्यामुळे आता वसुंधरा राजे आणि शिवराज सिंह कोणत्या भूमिकेत दिसणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT