Political News: वळसे-पाटलांच्या घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात! शिरुर लोकसभा मतदार संघात कोल्हेंपुढे आव्हान?

Dilip Walse Patil News: दिलीप वळसेपाटील यांना मानस पुत्र म्हणुन पवारांकडून सन्मान असताना पूर्वा वळसेपाटील यांनी वायबी चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आपल्या सामाजिक कामाला सुरवात केली.
Political News
Political NewsSaam TV
Published On

Dilip Walse Patil Vs Amol Kolhe:

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या कन्या पूर्वा वळसेपाटील तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून सक्रिय राजकारणात प्रवेश करत असल्याची चर्चा रंगलीय. या चर्चेला निमित्त ठरतंय अजित पवारांनी शिरुर लोकसभा मतदार संघावर ठेवलेला दावा! आता तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून शिरुर लोकसभा मतदार संघात कोल्हेंपुढे वळसेपाटलांचं आवाहन उभं रहातय का? असा प्रश्न जनतेच्या मनात आहे.

Political News
Maharashtra Political News : नव्या वर्षात नवीन मुख्यमंत्री मिळणार; महाराष्ट्रातील बड्या नेत्याची भविष्यवाणी

शरद पवारांसोबत वळसेपाटील कुटुंबाचा राजकिय प्रवास सुरु झाला. याच प्रवासात तीन पिढ्या घडल्या. दिलीप वळसेपाटील यांना मानस पुत्र म्हणुन पवारांकडून सन्मान असताना पूर्वा वळसेपाटील यांनी वायबी चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आपल्या सामाजिक कामाला सुरवात केली. राज्यातील तरुणाईसाठी शिक्षण,आणि आरोग्य या दोन गोष्टींवर फोकस करत राज्यात काम केलंय हाच धागा पकडून वळसेपाटलांचा मतदार संघ असलेल्या आंबेगाव शिरूरमध्ये तरुणाईलासोबत घेऊन आदिवासी,गोरगरीबापर्यत थेट जाऊन कामाला सुरुवात केलीय.

तरुण चेहरा म्हणुन पूर्वा वळसेपाटील राजकारणात सक्रिय होणार या चर्चा असल्या तरी तालुक्यात इतर तरुण राजकारणात येत आहेत. त्यामुळे घराणेशाहीच्या राजकारणाला जनता स्विकारणार नसल्याचे विरोधक सांगत आहेत.

शिरुर लोकसभा मतदार संघ तसा शिवाजी आढळरावपाटीलांचा बालेकिल्ला. आढळरावपाटीलांना आवाहन देण्यासाठी अजित पवार, दिलीप वळसेपाटलांनी ऐनवेळी अभिनेते म्हणुन अमोल कोल्हेंना रिंगणात घेऊन आढळरावपाटीलांना पराभुत केलं. तसेच शिरुर लोकसभेवर वर्चस्व कायम ठेवलं.

मात्र कोल्हेंचे आणि स्थानिक आमदारांचे कधी न पटल्याने मतदारसंघाकडे त्यांचे काहीसे दुर्लक्षितच राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर कोल्हेंनी शरद पवार गटासोबत रहाणं पसंत केलं. अन पवारांनीही कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, मतदार संघातील नाराजीची सल राजगुरुनगर येथील जाहिर कार्यक्रमात बोलून दाखवत, मला तुमच्यात यायला टोल लागतो असा गौप्यस्फोट केला. मात्र कोल्हेंचा हा रोख कुनाकडे होता..?

शिरुर लोकसभा मतदार संघात शरद पवार गटाकडून तरुण चेहरा म्हणुन अमोल कोल्हेंना कामाला लागण्याच्या सूचना पवारांनी दिल्यात. आता कोल्हेंपुढे तरुण चेहरा म्हणुन आवाहन देण्यासाठी अजित पवारांनी शिरुर लोकसभा मतदार संघावर दावा ठोकलाय खरा पण उमेदवार कोन हे गुलदस्त्यातच असताना पूर्वा वळसेपाटील,विलास लांडे आणि स्वत दिलीप वळसेपाटील या नावांची थेट चर्चा सुरु झालीय.

पण शिंदे गटात असलेले शिवाजी आढळरावपाटील देखील लोकसभेची तयारी करत असल्याने उमेदवारीची मोठी गुंतागुंत अजित पवार गटासमोर आहे. अशातच दिलीप वळसेपाटीलांच्या कन्या पूर्वा वळसेपाटील सक्रिय राजकारणात तरुणाईला साद घालत नवे पर्व... नवा ध्यास..! ही टॅगलाईन घेऊन पुढे येतायत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगलीय.

Political News
Auto Driver Sing Song Viral Video: ‘खोया खोया चाँद खुला...’, मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा ड्रायव्हरने दाखवले भन्नाट टॅलेंट; गाणं पाहून सुप्रसिद्ध संगीतकाराने घेतली दखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com