Indian Parliament Attack: संसदेत 22 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 30 मिनिटांपर्यंत झाला होता गोळीबार, आज पुन्हा घडली मोठी घटना

Indian Parliament Security Breach: 22 वर्षांपूर्वी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. बुधवारी याच हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त संसदेत दुसरी घटना घडली. आज लोकसभेत घुसखोरी करत दोन जणांनी सभागृहाच्या दालनात उडी मारली.
Know What Happened on 13 December 2001 Indian Parliament Attack
Know What Happened on 13 December 2001 Indian Parliament AttackSaam Tv
Published On

Parliament Attack 2001 Information:

आजच्याच दिवशी 22 वर्षांपूर्वी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. बुधवारी याच हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त संसदेत दुसरी घटना घडली आहे. इथे लोकसभेत घुसखोरी करत दोन जणांनी सभागृहाच्या दालनात उडी मारली. प्राथमिक माहितीनुसार, दोघांकडे स्मोक कँडलही होत्या.

आजच्याच दिशी म्हणजे 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर मोठा हल्ला झाला होता. सशस्त्र दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्यात नऊ सुरक्षा जवानांना प्राण गमवावे लागले. हा हल्ला पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी संघटनेने केला होता, अशी माहितीने नंतर समोर आली होती. हा हल्ला अद्याप देशातील नागरिक विसरलेले नसताना आजच्या घटनेने त्या वेदाणादायी आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Know What Happened on 13 December 2001 Indian Parliament Attack
Latur Amol shinde : पोलीस भरतीची तयारी करणारा अमोल शिंदे महाराष्ट्रातील लातूरचा; गावातही नसतो, आईवडील करतात मजुरी

या दोन्ही घटनांमध्ये फरक एवढाच की ज्यांनी हे केले ते तेव्हा शेजारील देशातील दहशतवादी होते आणि आजची घटना ज्यांनी घडवली ते आपल्याच देशातील लोक आहेत. या घटनेने केवळ संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही तर, लोकशाहीचे मंदिर म्हणजेच संसदच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य नागरिक किती सुरक्षेत असतील? हा विचार करायला भाग पाडले आहे. (Latest Marathi News)

आज संसदेत काय घडलं?

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी सांगितले की, प्रेक्षक गॅलरीतून दोन लोकांनी लोकसभेच्या चेंबरमध्ये अचानक उडी मारली. त्यांच्या हातात स्मोक कँडल होती ज्यातून पिवळा धूर निघत होता. त्यापैकी एक जण सभापतींच्या खुर्चीकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. यासोबतच हे लोक काही घोषणाही देत ​​होते. ही संसद सुरक्षेल गंभीर चूक असल्याचे काँग्रेस खासदार म्हणाले.

Know What Happened on 13 December 2001 Indian Parliament Attack
Parliament Security Breach : लोकसभेत नेमकं काय घडलं? सभागृहातील घटनाक्रम महाराष्ट्राच्या खासदारांनी जसाच्या तसा सांगितला

2001 मध्ये काय घडलं होतं?

दरम्यान, 13 डिसेंबर 2001 रोजी सकाळी 11.40 च्या सुमारास पाच दहशतवादी संसद भवन संकुलात घुसले. ते एका कारमध्ये आले होते, ज्याच्या विंडशील्डवर गृह मंत्रालयाचे बनावट स्टिकर होते. संशयास्पद वाटल्याने संसदेतील सुरक्षा रक्षकांनी कारला मागे जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर दहशतवादी खाली उतरले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावेळी 100 हून अधिक मंत्री आणि खासदार संसद भवनात उपस्थित होते.

हा गोळीबार 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ चालला. या संपूर्ण घटनेत पाचही दहशतवादी मारले गेले. पण आठ सुरक्षा कर्मचारी आणि संसदेतील एका माळीलाही आपला जीव गमवावा लागला. यासोबतच 15 जण जखमी झाले होते. हा हल्ला लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी केल्याचे तपासात समोर आले. हा आत्मघाती हल्ला करणारे पाच दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com