delhi Bharat Taxi news Saam tv
देश विदेश

Bharat Taxi : ओला-उबरपेक्षा स्वस्त, भारत टॅक्सीमध्ये करा सुरक्षित प्रवास, वाचा A टू Z फायदे

Bharat Taxi News : ओला-उबरला पर्याय ठरणारी सरकारी भारत टॅक्सी सेवा दिल्लीत सुरू झाली आहे. ३०% स्वस्त भाडे, नो सर्ज प्रायसिंग आणि ड्रायव्हर-मालक सहकारी मॉडेलमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • भारत टॅक्सी ही सरकारची सहकारी आधारित कॅब सेवा आहे

  • ओला-उबरप्रमाणे सर्ज प्रायसिंग नसल्याने भाडे स्थिर आहे

  • ड्रायव्हर्सना थेट फायदा मिळणारे मॉडेल आहे

  • महिलांसाठी महिला ड्रायव्हरचा पर्याय उपलब्ध आहे

आता दिल्लीत फिरायचं असेल तर काळजी करू नका, तुमच्याकडून स्थानिक टॅक्सी चालक किंवा ओला उबर सारख्या सेवा अव्वाच्या सव्वा रुपये आकारणार नाहीत किंवा तुमची फसवणूक करणार नाहीत. कारण आता 'भारत टॅक्सी' सेवा ही पूर्ण दिल्लीभर सुरु झाली आहे. ही एक ओला, उबर सारखी शासनाची नवी सेवा आहे. यामुळे नागरिकांची फसवणूक थांबेल आणि प्रवाशांना अधिक पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

जगातील पहिले सहकारी-आधारित टॅक्सी

भारत टॅक्सी ही फक्त टॅक्सी सेवा नाही, तर ड्रायव्हर्सच मालक असतील अशा सहकारी मॉडेलवर आधारित प्लॅटफॉर्म आहे. याची सुरुवात ६ जून २०२५ रोजी झाली असून आतापर्यंत यात ३ लाखांहून अधिक ड्रायव्हर्स आणि १ लाख ग्राहक जोडले गेले आहेत. सहकार मंत्रालयाने लाँच केलेली भारत टॅक्सी ही भारतातील एक आघाडीची ऑनलाइन कार भाड्याने देणारी कंपनी आहे, जी १०० हून अधिक शहरांमध्ये टॅक्सी सेवा देते. ही टॅक्सी जगातील पहिले सहकारी-आधारित राइड-हेलिंग अॅप आहे. या अॅपचा सर्वात जास्त फायदा कॅब चालकांना होणार आहे.

भारत टॅक्सीचे भाडे निश्चित आणि पारदर्शक

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत टॅक्सीचे भाडे इतर अ‍ॅप्सपेक्षा ३०% पर्यंत स्वस्त असणार आहे. इतरवेळेस म्हणजेच पाऊस किंवा ट्रॅफिकच्या वेळेस ओला उबर सारख्या कंपन्या भाडे वाढ करतात. मात्र भारत टॅक्सीमध्ये ‘सर्ज प्राईसिंग’ नसेल. भाडे आधीच निश्चित आणि पारदर्शक असेल. यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महिला ड्रायव्हर उपलब्ध

भारत टॅक्सी ही सेवा हॅचबॅक, सेडान, एसयूव्ही आणि टेम्पो ट्रॅव्हलर्ससारखे पर्याय देते. यामध्ये महिलांसाठी स्कूटर सिस्टम देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे महिलांना महिला ड्रायव्हरची आवश्यकता असल्यास ती महिला ड्रायव्हर निवडू शकते. भारत टॅक्सी अॅप स्थानिक भाड्याने देणे, एकेरी ड्रॉप, राउंड ट्रिप आणि विमानतळ पिकअप/ड्रॉप सारख्या सेवा देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT