Kanchanjunga express accident in West Bengal: Saamtv
देश विदेश

West Bengal Train Accident Video: पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना! 'कंचनजंगा एक्स्प्रेस'ला मालगाडीची धडक; अपघातस्थळाचा थरकाप उडवणारा VIDEO

Kanchanjunga express accident in West Bengal Video: पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातस्थळावरील भयंकर व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

Pramod Subhash Jagtap

१७ जून २०२४

पश्चिम बंगालमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये समोरासमोर धडक झाली. या भयंकर अपघातात आत्तापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. या भयंकर अपघाताचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये धडक झाली. सिलीगुडीमधील जलपाईगुडी स्थानकातून वेळेवर सुटल्यानंतर रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान कांचनजंगा एक्स्प्रेस या पॅसेंजर ट्रेनला अपघात झाला. एका मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.

या धडकेनंतर कांचनजंगा पॅसेंजर ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच दुर्घटनेतील मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातस्थळी सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

या भयंकर दुर्घटना स्थळीचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये मालगाडी थेट पॅसेंजर ट्रेनमध्ये घुसल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर NDRF, SDRF टीम आणि 15 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या बचावकार्य सुरू असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव वॉर रूम मधून घटनेची माहिती घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

SCROLL FOR NEXT