West Bengal Train Accident: पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात; कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडी धडकली; अनेकांचा मृत्यू

Kanchanjunga Express Accident Video: कंचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की एक्स्प्रेस गाडी रुळावरून घसरली. या अपघातात आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
West Bengal Train Accident: पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात; कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडी धडकली; अनेकांचा मृत्यू
West Bengal Railway AccidentSaam TV

पश्चिम बंगालच्या दार्जलिंगमध्ये रेल्वेचा मोठा अपघात झाला. सिग्नलची वाट पाहत उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की एक्स्प्रेस रुळावरून घसरली. या अपघातात आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. रंगपनीर स्टेशनजवळ हा अपघात झाल्याचे वृत्त आहे.

या अपघातात रेल्वेच्या मागील बाजूच्या तीन डब्ब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंचनजंगा एक्सप्रेस एनजेपीहून सियालदहकडे जात होती. सिलीगुडी ओलांडल्यानंतर एक्स्प्रेस रंगपनीर स्टेशनजवळ आली.

दरम्यान, निजबारीजवळ सिग्नलची वाट पाहत एक्स्प्रेस उभी होती. यावेळी भरधाव वेगात मालगाडी आली. काही क्षणातच या मालगाडीने एक्स्प्रेसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की एक्स्प्रेसचे तीन डब्बे रुळावरून खाली घसरले. या घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे. सध्या युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. रुळावरून बोगी हटवून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीटरवर पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं आहे.

तसेच अपघातातील जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. हा रेल्वे अपघात कसा झाला? याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी लोको पायलटची चौकशीही सुरू केली आहे. मालगाडीचा चालकही गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

West Bengal Train Accident: पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात; कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडी धडकली; अनेकांचा मृत्यू
Uttar Pradesh Train Fire: धावत्या मालगाडीला अचानक आग; पाहता पाहता लाखोंचा कोळसा जळून खाक, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com