Uttar Pradesh Train Fire: धावत्या मालगाडीला अचानक आग; पाहता पाहता लाखोंचा कोळसा जळून खाक, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Uttar Pradesh Freight Train Fire: उत्तर प्रदेशमध्ये मालगाडीच्या बोगीला आग लागल्याची घटना घडली. रविवारी रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली. या बोगीत कोळसा आणि इतर सामान होते.
Uttar Pradesh Train Fire
Uttar Pradesh Train FireSaam Tv

उत्तर प्रदेशमध्ये एका मालगाडीच्या बोगीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री सीतापूरमध्ये ही घटना घडली आहे. मालगाडीच्या बोगीत ठेवलेला लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे स्थानकाच्या रेल्वे अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेतली. सीतापूरमधील परसेंडी रेल्वे स्थानकाच्या परिसरात या मालगाडीच्या बोगीला आग लागली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मालगाडी दिल्लीहून पश्चिम बंगालकडे जात होती. या मालगाडीच्या बोगीत कोळसा आणि अनेक सामान ठेवले होते. हे सामान लाखो रुपयांचे होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बोगीला लागलेली आग विझवण्याचे काम रात्रभर सुरु होते. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

मालगाडीच्या बोगीत कोळसा ठेवला होता. कोळशामुळेच आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मालगाडीच्या बोगीला आग लागल्यानंतर बोगीचा भाग वेगळा करुन मालगाडी पुढे पश्चिम बंगालकडे रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुरुवात दिल्लीहून पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या या मालगाडीतून अचानक धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर परसेंडी रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तरांना ही माहिती देण्यात आली. यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोगी उघडली तेव्हा त्यात आग लागली होती. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोगी मालगाडीपासून वेगळी केली आणि मालगाडी पश्चिम बंगालकडे रवाना झाले. रात्रभर आग विझवण्याचे काम सुरु होते.

Uttar Pradesh Train Fire
Security Forces in Kashmir : काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; सुरक्षा दलाच्या जवानांनी केला एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. बोगीत कोळसा असल्याने आग वाढतच होती. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली आहे.

Uttar Pradesh Train Fire
Meerut Crime News: संतापजनक! बापच ठरला वैरी, बहीण-भाऊ भांडतात म्हणून चक्क २ वर्षाच्या मुलीला नदीत फेकलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com