Meerut Crime News: संतापजनक! बापच ठरला वैरी, बहीण-भाऊ भांडतात म्हणून चक्क २ वर्षाच्या मुलीला नदीत फेकलं

Crime News: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या २ वर्षाच्या चिमुकलीला क्षुल्लक करणांवरुन गंगा कालव्यात फेकून दिले आहे.
Uttar Pradesh Crime News
Meerut Crime NewsSaam tv
Published On

उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या २ वर्षाच्या चिमुकलीला बहीण- भाऊ भांडतात म्हणून गंगेच्या कालव्यात फेकून दिले आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरुन गेला असून पोलिस मुलीचा शोध घेत आहेत.

Uttar Pradesh Crime News
Crime News: खुनाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये दगडाने ठेचून तरुणाला संपवलं; जालन्यात शेतीच्या वादातून एकाची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh )जिल्ह्यातील मेरठ येथील मधई गावात ही घटना घडली आहे. चिमुकली आपल्या कुटुंबियासोबत मधई गावात वास्तव्यास होती. १४ जून रोजी पोलिसांना २ वर्षाची चिमुकली सकाळ पासून गायब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर चिमुकलीच्या तपासासाठी शोधकार्य सुरु झाले

पोलिसांनी संपूर्ण गावात चौकशी केली असता गावातील नागरिकांनी चिमुकलीचे वडिल सुलेमानबद्दल धक्कादायक माहिती समोर आली. सुलेमानला असलेल्या दोन मुली यापूर्वीही संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता(missing) झाल्या होत्या. पोलिसांनी त्यानंतर सुलेमानची सखोल चौकशी केली असता त्यानेच आपल्या २ वर्षाच्या चिमुकलीला गंगा कालव्यात फेकल्याने सांगितले.

क्षु्ल्लक गोष्टींवरुन टोकाचे पाऊल...

सुलेमानची चौकशी (inquiry) केली असता त्याने पोलिसांना सांगितले की, मला एक मुलगा आहे. मुलगी आणि मुलगा रोज एकमेंकाशी भांडत असत. त्या दिवशीही दोंघ एकमेंकासोबत भांडत होते. राग अनावर झाल्याने सुलेमाने आपल्या २ वर्षीय मुलीला गंगा कालव्यात फेकून दिले. पोलिसांनी सध्या सुलेमानला ताब्यात घेतले असून त्याची अजून चौकशी करण्यात येत आहे.

Uttar Pradesh Crime News
Navapur Crime : खांडबारा चोरविहीर परिसरात आढळले मानवी अवयव; एकाच आठवड्यात तिसऱ्या घटनेने परिसरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com