Jalna OBC Protest: CM शिंदे अन् शंभर कोटी, मनोज जरांगेंची चौकशी करा; बड्या ओबीसी नेत्याचा खळबळजनक आरोप

OBC Leaders Allegation On Eknath Shinde And Manoj Jarange: जालन्यात आज ओबीसी आरक्षणाचा तिसरा दिवस आहे. ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप
Jalna OBC ProtestSaam Tv
Published On

अक्षय शिंदे, साम टीव्ही जालना

जालन्यात आज सलग तिसऱ्या दिवशी ओबीसी समाजाचं आरक्षण सुरू आहे. शंभर कोटीच्या प्रकरणावर जरांगे यांची चौकशी करा. सत्य समोर येईल, असा खळबळजनक आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तर एकनाथ शिंदेंनी बदनामी झाकण्यासाठी मनोज जरांगेंच्या माध्यमातून आंदोलन सुरू केल्याचा गंभीर आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, जालन्यात सध्या वातावरण पेटलेलं दिसत (Jalna OBC Protest) आहे. एकीकडे मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करीत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाज देखील आंदोलनाच्या रिंगणात उतरल्याचं दिसत आहे. एखाद्या नेत्याने तरी ओबीसी समाजाबद्दल बोलावं, अशी खंत देखील ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे ओबीसींचे आमरण उपोषण सुरू आहे. आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान या सरकारला ओबीसींची कसलीही गरज नाही, तमा नाही हे सरकार फक्त मराठ्यांचं सरकार आहे, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला आहे. महाराष्ट्रात फक्त मराठा समाज राहतो, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप
OBC - VJNT Girl students: मोठी बातमी! 1 जूनपासून महाराष्ट्रातील ओबीसी आणि व्हिजेएनटी विद्यार्थिनींची 100 टक्के फी राज्य सरकार भरणार

आमचं आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या इशाऱ्यावर चालणार नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यामुळे त्यांची जी बदनामी झाली होती, ती बदनामी झाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंना समोर करून आंदोलन सुरू केलंय,असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.

सध्या नेतेमंडळीत मराठा आरक्षणासाठी चढाओढ लागली आहे, तर आमची अजून कोणी दखल घेतली नसल्याचं (Manoj Jarange) ओबीसी नेते म्हणत आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं पत्र राज्यपालांकडून मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप
Laxman Hake News: OBC नेते लक्ष्मण हाके जालन्यात दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com