Navapur Crime : खांडबारा चोरविहीर परिसरात आढळले मानवी अवयव; एकाच आठवड्यात तिसऱ्या घटनेने परिसरात खळबळ

Nandurbar News : नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात आठवड्याभरात दोन लोकांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Navapur Crime
Navapur CrimeSaam tv

सागर निकवाडे 

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील चोरविहीर परिसरामध्ये नाल्यामधील पाईपाजवळ मानवी शरीराचे कापलेले अवयव आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नंदुरबार पोलीसाचे पथक दाखल झाले आहे. सोबतच फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी मानवी शरीराचे अवयव मिळून आल्याने त्याचा तपास करीत आहे. 

Navapur Crime
Shirdi Sai Baba : साई चरणी ४२ लाख ८० हजार रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण

नवापूर (Navapur) तालुक्यातील खांडबारा परिसरात आठवड्याभरात दोन लोकांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हत्येचा शोध लावण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे. परंतु महिलेचा हत्यारांच्या शोध अजून लागला नाही. पहिल्या घटनेत झामट्यावड परिसरामध्ये पाईपामध्ये एक मृतक व्यक्ती आढळून आला होता. तर दुसरी घटना पळशी धरणात महिलेचे धडापासून वेगळे केलेले शीर आढळून आले होते. यानंतर तिसरी घटनेते चोरविहीर परिसरात माणसाचे कापलेले अवयव सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Navapur Crime
Dhule Corporation : जीर्ण व धोकादायक १५६ घरांना धुळे महापालिकेकडून नोटीस

नवापूर (nandurbar) तालुक्यातील याच परिसरात काही दिवसांपूर्वी पळशी धरणात महिलेचे धडापासून वेगळे केले शीर आढळून आले होते. त्याच महिलेचे अवयव या परिसरात सापडले आहे, की दुसऱ्या व्यक्तीचे हत्या झाली आहे का? यासंदर्भात नंदुरबार पोलीस तपास करीत आहे. नाल्यामध्ये मिळून आलेले मानवी अवयव पोलिसांनी संकलित केले असून त्याचा शोध पोलीस करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com