Mumbai News : नालासोपाऱ्यात २ मुलांचा तर संगमनेरमध्ये ३ मुलींचा बुडून मृत्यू; ३ मुलं अद्यापही बेपत्ता

Sangamner Accident : नालासोपाऱ्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तलावात पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे तर 3 मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही.
Mumbai News
Mumbai NewsSaam Digital

नालासोपाऱ्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तलावात पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे तर 3 मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही. पूर्व हवाईपाडा, फादरवाडी या परिसरात आज दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. अमित (वय 11) अभिषेक ( वय 12) असे मृतदेह मिळालेल्या मुलांची नाव आहेत.

Mumbai News
APMC Market Vashi: 'एपीएमसी'च्या पदपथावर बदामांचं पॅकिंग, प्रशासनाची डाेळेझाक? Video Viral

घटनास्थळावर नालासोपारा पूर्व संतोषभूवन या परिसरातून 5 मुलांचा ग्रुप आज दुपारी तलावात पोहायला गेला होता. मात्र या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली होती. यातील दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. तर तीन मुलं बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. बेपत्ता मुलं तलावात बुडाली आहेत की घाबरून तेथून पळून गेली आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत.सध्या वालीव पोलीस, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले असून त्या मुलांचा शोध घेतायेत.

Mumbai News
Hijab Ban: ब्रेकिंग! मुंबईतील महाविद्यालयात हिजाब बंदी; विद्यार्थ्यांची थेट हायकोर्टात धाव, कॉलेज परिसरात पोलिसांचा बंदोबस्त

अहमदनगरमध्ये आज अर्धवट असलेल्या शेततळ्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावात ही दुर्घटना घडली. काम सुरू असलेल्या अर्धवट शेततळ्यात पावसाचं पाणी साचलं होत. या तळ्याच्या शेजारी मुली खेळत होत्या. यावेळी त्या पाण्यात उतरल्या असाव्यात आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मुली बुडाल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त होत आहे. अनुष्का बडे (वय ११), सृष्टी ठापसे (१३) आणि वैष्णवी जाधव (वय १२) अशी मृत मुलींची नावं आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com