Mamata Banerjee's Comeback Continues, TMC Dominates Bar Council Polls saam tv
देश विदेश

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

West Bengal Politics : विधानसभा निवडणुकीनंतर धक्क्यानंतर धक्के खाणाऱ्या ममता बॅनर्जी पु्न्हा एकदा कमबॅक करताना दिसत आहेत. नेत्यांच्या बंडखोरीनंतर टीएमसीनं बंगाल बार कौन्सिल निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलाय.

Bharat Jadhav

  • पश्चिम बंगाल बार कौन्सिलच्या 23 जागांपैकी टीएमसीने तब्बल 15 जागा जिंकल्या.

  • भाजप आणि डाव्या आघाडीला प्रत्येकी 3 जागांवर समाधान मानावे लागले.

  • काँग्रेसला 2 जागा मिळाल्या.

विधानसभा निवडणुकीनंतर धक्क्यानंतर धक्के खाणाऱ्या ममता बॅनर्जी पु्न्हा एकदा कमबॅक करताना दिसत आहेत. नेत्यांच्या बंडखोरीनंतर टीएमसीनं बंगाल बार कौन्सिल निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलाय. विधानसभा निवडणुकीनंतर बंडखोरी, पक्षांतर, कायदेशीर खटले आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप अशा अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर तृणमूल काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाला आहे. पश्चिम बंगाल बार कौन्सिलच्या निवडणुकीत २३ पैकी १५ जागा जिंकून पक्षाने त्यावर आपले वर्चस्व कायम राखलंय.

पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर आलेला असूनही वकिलांच्या संघटनेच्या निवडणुकीत पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या. हे निकाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या अगदी उलट आहेत. त्यावरून कायदेतज्ज्ञांच्या वर्गातील काही घटकांमध्ये टीएमसीचा (TMC) प्रभाव अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. विजयी ठरलेल्या तृणमूल उमेदवारांना माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या शिफारशीवरून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावरून ममता बॅनर्जी यांचा करिष्मा अजूनही राज्यात असल्याची चर्चा सुरू झालीय. त्याचमुळे भाजपची धडधड वाढलीय.

दरम्यान या निकालांमुळे तृणमूल काँग्रेसच्या (TMC) गोटात आनंदाचे वातावरण आहे. यात तृणमूलच्या वकील आघाडीचे सुभाषिस चक्रवर्ती हे सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी झालेले उमेदवार ठरले. तृणमूलच्या इतर प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये बैसानोर चॅटर्जी, अन्सार मंडल, अशोक देब, इंद्रनील बसू आणि सिद्धार्थ मुखर्जी यांचा समावेश होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 'बार कौन्सिल ऑफ इंडिया' महिला उमेदवारांमधून दोन अतिरिक्त महिला सदस्यांना नामनिर्देशित करेल. या नामनिर्देशनांमुळे 'पश्चिम बंगाल बार कौन्सिल'ची एकूण सदस्यसंख्या २५ होईल. एकूण ७५ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यात टीएमसीचे २३, भाजपचे २२ आणि डाव्या पक्षाने १२ तर १८ अपक्ष उमेदवार निवडणुकींच्या मैदानात उतरले होते.

या बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या निवडणुकीत भाजपनं आपल्या पहिल्या तीन जागा कायम राखल्या आहेत. तर काँग्रेसनं दोन जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे डाव्या आघाडीचं संख्याबळ दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मागील निवडणुकीतील चार जागांवरून ते कमी होत यावेळी फक्त तीन जागांवर जिंकलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

SCROLL FOR NEXT