ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

ST Bus NCMC Card: १ ऑक्टोबर २०२६ पासून एसटीच्या सवलतीच्या तिकीटासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC कार्ड आवश्यक असेल.
एसटी NCMC कार्ड
एसटी NCMC कार्डmeta ai
Published On: 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ST सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट घेण्यासाठी NCMC कार्डचा वापर अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सवलतीच्या तिकीट व्यवस्थेत डिजिटल प्रणालीचा वापर वाढणार आहे.

एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या सामाजिक घटकांना शासनाच्या निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. आता या सवलतीचा वापर सोपा आणि डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी NCMC कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे.

एसटी NCMC कार्ड
EPFO New Rule 2026 : मोठी बातमी! ₹25,000 EPFO मर्यादा लागू; तुमचा पगार कमी होणार?

NCMC कार्ड नसल्यास काय होणार?

१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच वितरित केले जाणार आहे. मात्र, ज्या प्रवाशांकडे Active NCMC कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची QR कोड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे. नोंदणी पावती वाहकाच्या ETM मशीनवर स्कॅ करून तिकीट घेता येईल. ही पावती ३० दिवसांपर्यंत वैध राहणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी NCMC कार्ड अॅक्टीव्ह करून त्यामध्ये Top-up करणं गरजेचं आहे.

एसटी NCMC कार्ड
DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 2026 मध्ये ‘या’ राज्यांनी वाढवला DA, तुमच्या राज्याचा नंबर आहे का?

कार्ड नोंदणी कुठे करता येणार?

NCMC कार्डची नोंदणी आणि वितरण एसटी बसस्थानके, आगार तसेच अधिकृत केंद्रावर करण्यात येत आहे. ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडची अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

BHIM App वरून करता येईल Top-up

कार्डमध्ये पैसे भरण्यासाठी BHIM Appचा वापर करता येणार आहे. कार्डावर QR कोड स्कॅन करून Top-up करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, आधाक बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यास, आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर येणाऱ्या OTPच्या माध्यमातून NCMC कार्ड नोंदणी करण्याची पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र महिला आणि जेष्ठ नागरिकांनी १ ऑक्टोबरआधी NCMC कार्ड नोंदणी करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com