Sakshi Sunil Jadhav
आता बायोमेट्रिक पडताळणीमध्ये अडचण आल्याने लाभार्थ्यांना आधार OTP द्वारे NCMC कार्डची नोंदणी करता येणार आहे.
NCMC कार्ड हरवल्यावर संबंधित कार्ड ब्लॉक करून त्याचा गैरवापर टाळता येणार आहे.
हरवलेल्या कार्डाच्या बदल्यात नवीन NCMC घेण्यासाठी ११९ रुपये शुल्क आकारलं जाईल.
१६ सप्टेंबर २०२६ पासून नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना QR कोड असलेली पावती देण्यात येणार आहे. या QR कोडच्या मदतीने प्रवासाच्या वेळी सवलतीचे तिकीट मिळेल.
प्रवासादरम्यान ETIM मशीनवर पावतीवरील QR कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित सवलतीचे तिकीट दिले जाईल.
नोंदणी केल्यानंतर मिळणारी QR कोड पावती 30 दिवसांपर्यंत वैध राहणार आहे.
नवीन NCMC कार्ड उपलब्ध होईपर्यंत वैध QR कोड पावतीचा वापर सवलतीच्या प्रवासासाठी करता येणार आहे.
नव्या सुविधांमुळे बायोमेट्रिक अडचणी, कार्ड हरवणे आणि कार्ड मिळण्यापूर्वी प्रवास करण्यासंदर्भातील प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.