BJP Leader Suvendu Adhikari PA Shot Dead Saam TV
देश विदेश

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

BJP Leader Suvendu Adhikari PA Shot Dead: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर मोठी घटना घडली. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Priya More

Summary -

  • पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार वाढला

  • भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या

  • मध्यमग्राममध्ये भररस्त्यात कार अडवून केला हल्ला

  • या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार घटना सुरूच आहे. बुधवारी रात्री उशिरा भाजप नेते आणि ममता बॅनर्जी यांचा पराभव करून विजयी झालेले सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. चंद्रनाथ रथ असे त्यांच्या पीएचे नाव होते. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेली एक व्यक्ती या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झाली आहे. या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये रस्त्यावरच सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारला महामार्गावर रोखलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. यामधील ३ गोळ्या लागल्याने चंद्रनाथ रथ गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रनाथ रथ हे सुवेंदू यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून पीए म्हणून काम करत होते. असा आरोप आहे की, बुधवारी रात्री मध्यमग्राममध्ये एका वाहनाला घेरण्यात आले आणि त्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या.

चंद्रनाथ रथ प्रवास करत असलेल्या कारच्या पुढच्या भागाला गोळी लागल्याने कारची विंडशील्ड फुटली. कारमध्ये चंद्रनाथ रथ पुढच्या सीटवर बसले होते. चंद्रनाथ यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्या आणि अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते कोलकाताहून मध्यमग्राम येथील त्यांच्या घरी जात होते. या गोळीबारामध्ये चंद्ररथ यांच्या कारचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या मध्यमग्राम क्रॉसिंग येथील विबासिटी नर्सिंग होममध्ये चंद्रनाथ यांच्या चालकावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी चंद्ररथ यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर भाजपचे सर्व विजयी उमेदवार घटनास्थळी पोहोचले आहेत. कौस्तव बागची, पियुष कंदिया, शंकर घोष आणि शंकर चॅटर्जी यांच्यासह भाजपचे अनेक आमदार घटनास्थळी दाखल झालेत. संपूर्ण परिसरात प्रचंड तणाव आहे. पोलिस, आरएएफ आणि केंद्रीय दलांच्या मोठ्या तुकडीने संपूर्ण परिसर सील केला आहे. सध्या पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arshdeep Singh: दिल नैयो लगदा! अर्शदीप सिंगची प्रेयसी समरीन कौर आहे तरी कोण?

आंदोलकांवर AK-47 चालवणाऱ्या पोलिसावर मोठी कारवाई! 200 विद्यार्थ्याही ताब्यात

Maharashtra News Live Update: सोनम वांगचुक राजघाटावर दाखल

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो 'ही' 3 महत्त्वाची कामे आजच करा; अन्यथा, पीएम किसानचा 24 वा हप्ता विसरा

Jana Nayagan: विजय थलापती यांच्या 'जन नायकन'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; अवघ्या 4 दिवसांत 200 कोटींचा टप्पा पार

SCROLL FOR NEXT