WEST BENGAL SCHOOL VAN TRAIN ACCIDENT: 3 DEAD, SEVERAL STUDENTS INJURED IN MURSHIDABAD Saam Tv
देश विदेश

Accident News : भयंकर अपघात! रेल्वेची स्कूल व्हॅनला धडक, ३ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

West Bengal School Van Accident Update News : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात स्कूल व्हॅनला पॅसेंजर ट्रेनची भीषण धडक बसल्याने ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. रेल्वेकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात स्कूल व्हॅनला पॅसेंजर ट्रेनची धडक

  • दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू, ५ जण गंभीर तर ८ जण किरकोळ जखमी

  • कर्णसुबर्णा रेल्वे फाटक खुले असताना व्हॅन रुळ ओलांडत होती

  • जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

West Bengal Railway Hit School Van Accident पश्चिम बंगालमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या व्हॅनला रेल्वेने धडक दिली आहे. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर आहेत. तसेच ८ जण किरकोळ जखमी आहेत. सदर घटना सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास बहारामपूर परिसरातील कर्णसुबर्णा रेल्वे फाटकाजवळ घडली. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी एक स्कूल व्हॅन रेल्वे रुळ ओलांडत असताना निमटिता-कटवा पॅसेंजर ट्रेनने तिला जोरदार धडक दिल्याची माहिती आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कर्णसुबर्णा रेल्वे फाटक त्या वेळी खुले होते. त्यामुळे शाळेची व्हॅन तसेच एक सायकलस्वार रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी वेगाने येणाऱ्या पॅसेंजर ट्रेनने व्हॅनला धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून बहारामपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रेल्वे प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हावड्याकडे जाणारी नवद्वीप एक्सप्रेस गेल्यानंतरही गोबिंदपूर रेल्वे फाटक खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांनी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि हा भीषण अपघात घडला. दरम्यान, अपघाताची गंभीर दखल घेत पूर्व रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी विशेष पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परांडा शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या अन् दगडफेकीने भर चौकात गोंधळ

Tilache Laddu Recipe: थंड वातावरणात झटपट बनवा शरीराला उब देणारे पौष्टिक तिळाचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

Turmeric Milk Benefits : रात्री हळदीचं दूध प्यायल्यानं शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या

Rahul Gandhi Video: पूरी दाल ही काली है...राहुल गांधींची मोठी घोषणा; मोदी सरकारचं टेन्शन वाढणार

भाजपच्या दिग्गज युवा नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT