देश विदेश

Shocking: संतापजनक! कॉलेजवरुन घरी येताना MBBS विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, तीन आरोपींना अटक

West Bengal Crime: दुर्गापूरमध्ये एमबीबीएस विद्यार्थिनीवर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर सामूहिक बलात्कार झाला. तीन आरोपींना अटक, पोलिस तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तपास, राज्यभर संताप, महिला सुरक्षेवर प्रश्न पुन्हा चर्चेत आहे.

Dhanshri Shintre

पश्चिम बंगाल पुन्हा एकदा हादरला आहे. दुर्गापूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयासमोर एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे केवळ दुर्गापूर नव्हे तर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, आणखी काही जणांवर संशय व्यक्त केला गेला आहे. संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी असलेली ही वैद्यकीय विद्यार्थिनी शुक्रवारी रात्री आपल्या मैत्रिणीसोबत जेवायला बाहेर गेली होती. रात्री साधारण ८:३० ते ९:०० च्या दरम्यान ती कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडली. तेव्हा गेटजवळ तीन तरुण उभे होते. त्यांनी प्रथम विद्यार्थिनीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि नंतर तिच्या केसांना धरून तिला जबरदस्तीने गेटसमोर असलेल्या जंगलात ओढून नेले. तिथे त्या तिघांनी तिच्यावर अमानुषपणे सामूहिक बलात्कार केला. या वेळी तिच्या मैत्रिणीने धैर्य दाखवत पळ काढला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.

दरम्यान, पीडित मुलीच्या पालकांना रात्री उशिरा या घटनेची माहिती मिळाली. ते तातडीने दुर्गापूरला गेले आणि न्यू टाउनशिप पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. विद्यार्थिनीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिची प्रकृती स्थिर आहे.

दुर्गापूरचे उपविभागीय दंडाधिकारी रंजना रॉय यांनी रुग्णालयात भेट देऊन पीडितेला आणि तिच्या आईला सांत्वना दिली. त्यांनी सांगितले की, पीडितेची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि प्रशासन तिला सर्वतोपरी मदत देईल. तिला न्याय मिळण्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिसांनी या प्रकरणात गंभीरपणे तपास सुरू केला असून, फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात येत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, कॉलेजमधील काही कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे.

विद्यार्थिनीच्या जबाबानुसार, तिचा मित्र देखील त्या रात्री तिच्यासोबत होता. तिघा आरोपींनी रस्ता अडवला तेव्हा तिचा मित्र तिथून निघून गेला. त्यानंतर आरोपींनी तिचा फोन घेतला आणि तिला जंगलात नेऊन बलात्कार केला. या घटनेनंतर त्यांनी विद्यार्थिनीला धमकी दिली की जर तिने पोलिसांकडे तक्रार केली, तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील. इतकेच नाही, तर नंतर तिचा मोबाईल फोन परत देण्यासाठी आरोपींनी पैशांची मागणी केली होती.

या भयानक घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. अनेकांनी न्यायाची मागणी केली असून महिला सुरक्षेवरील प्रश्न पुन्हा एकदा अग्रक्रमावर आले आहेत. पीडितेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दु:ख व्यक्त केले. त्यांनी म्हटले, मी माझ्या मुलीला डॉक्टर होण्यासाठी दुर्गापूरला पाठवले होते. पण तिच्यासोबत असे घृणास्पद कृत्य घडेल असे मला कधीच वाटले नव्हते. आता या ठिकाणी तिला पुन्हा पाठवायचे धाडस माझ्यात राहिले नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

SCROLL FOR NEXT