TERMINALLY ILL FATHER POISONS TWO CHILDREN BEFORE SUICIDE IN GUJARAT
TERMINALLY ILL FATHER POISONS TWO CHILDREN BEFORE SUICIDE IN GUJARATSaam Tv

Shocking: कॅन्सरग्रस्त बापाने आधी २ मुलांचा जीव घेतला, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य, परिसरात एकच खळबळ

Gujrat Crime News: गुजरातमधील द्वारका जिल्ह्यात, कर्करोगाने पीडित ४० वर्षीय व्यक्तीने आत्महत्येपूर्वी आपल्या दोन अल्पवयीन मुलांना विष देऊन ठार केल्याचा आरोप आहे.
Published on
Summary
  • देवभूमी द्वारका जिल्ह्यात वडिलांनी दोन लहान मुलांना विष देऊन ठार मारून आत्महत्या केली.

  • मृत व्यक्ती दीर्घकाळापासून गंभीर कर्करोगाशी झुंज देत होता.

  • मुलांचे भवितव्य सुरक्षित राहणार नाही, या भीतीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

  • पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून तपास सुरू केला आहे.

गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्याने सोमवारी एक हृदयद्रावक घटना पाहिली. येथे कर्करोगाने बाधित असलेल्या एका ४० वर्षीय वडिलांनी आपल्या दोन लहान मुलांना विष देऊन ठार मारले आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. पोलिसांनी प्राथमिक तपासात असे म्हटले आहे की, हा माणूस काही काळापासून आजारी होता आणि मृत्यू जवळ आल्याची जाणीव झाल्याने त्याने हे अतिशय टोकाचे पाऊल उचलले.

गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्याने सोमवारी एक हृदयद्रावक घटना पाहिली. येथे कर्करोगाने बाधित असलेल्या एका ४० वर्षीय वडिलांनी आपल्या दोन लहान मुलांना विष देऊन ठार मारले आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. पोलिसांनी प्राथमिक तपासात असे म्हटले आहे की, हा माणूस काही काळापासून आजारी होता आणि मृत्यू जवळ आल्याची जाणीव झाल्याने त्याने हे अतिशय टोकाचे पाऊल उचलले.

TERMINALLY ILL FATHER POISONS TWO CHILDREN BEFORE SUICIDE IN GUJARAT
Crime News: धक्कादायक! लग्नासाठी मुलीने दिला नकार, चुलत भावाला राग अनावर, रस्त्यावरच बहि‍णीवर केले चाकूने सपासप वार

पोलिसांच्या माहितीनुसार, छेत्रीया यांनी सोमवारी आपल्या घरात प्रथम आपल्या पाच वर्षांच्या मुलीला आणि तीन वर्षांच्या मुलाला विष प्राशन करण्यास भाग पाडले. मुलं झोपलेली असताना त्यांना विष दिले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. मुलांना विष दिल्यानंतर त्याने स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केली. काही तासानंतर शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता तिघेही मृत अवस्थेत आढळले.

TERMINALLY ILL FATHER POISONS TWO CHILDREN BEFORE SUICIDE IN GUJARAT
Shocking: ५ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरले, नंतर...

घटनेची माहिती मिळताच कल्याणपूर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून तिन्ही मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, या संदर्भात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक रहिवाशांमध्ये मोठे दुःख पसरले असून, गावकऱ्यांनी प्रशासनाला अशा आजारी रुग्णांना भावना आणि मानसिक आधार देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गावातील वातावरणात शोककळा असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com