weather update heavy rainfall september 2025 x
देश विदेश

Weather Update : सप्टेंबरमध्ये पाऊस कोसळणार? हवामान खात्याचा धडकी भरवणारा इशारा

Rain Update : सप्टेंबर महिन्यामध्ये देशभरात जोरदार पाऊस बरसणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. सप्टेंबरमध्ये जून महिन्यापेक्षा जास्त पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.

Yash Shirke

  • हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस पडणार आहे.

  • जूनपेक्षा सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात ३ ते १८ सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीचे इशारे देण्यात आले आहेत.

IMD Weather Update : यंदा पावसाळा लवकर सुरु झाला, जून महिन्यामध्येच पावसाची सुरुवात झाली. जून महिन्यामध्ये झालेल्या पावसाच्या २३ टक्के अधिक पाऊस सप्टेंबर महिन्यामध्ये पडू शकतो, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान मॉडेल्सनुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय हवामान खात्याच्या विस्तारित श्रेणी अंदाजानुसार, ४ सप्टेंबरपर्यंत उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. त्यातही १८ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो असे संकेत आहेत. नैऋत्य मान्सून हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत (ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात) देशात दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या १०६ टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे ३१ जुलै रोजी हवामान खात्याने म्हटले होते. ऑगस्टमध्ये सामान्य आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.

पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये उत्तर भारतामध्ये आणखी पाऊस पडेल. सध्या काही ठिकाणी मुसळधार पाऊल पडत आहे. या ठिकाणी देखील पावसाची तीव्रता वाढेल. त्यानंतर मध्य भारतातही मुसळधार पाऊस सुरु राहील. पुढील १० दिवसांमध्ये देशात चांगला पाऊस पडणे अपेक्षित आहे, असे हवामान पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम राजीवन यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्ठी झाली आहे. उत्तरेकडील अनेक नद्या पूरग्रस्त झाल्या आहेत. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पावसाची तीव्रता पश्चिमी विक्षोभ आणि मान्सूनच्या वाऱ्यांमुळे वाढत आहे. असे आयएमडीचे महासंचालक एम महापात्रा यांनी सांगितले. या भागात पावसाची तीव्रता कमी होण्यास लवकरच सुरुवात होईत. त्यानंतर देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम भागात पाऊस सुरुच राहील. ३ सप्टेंबरच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात होईल, अशी माहिती महापात्रा यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT