
पुण्यात पीएमपी बस चालवत असताना चालक अनिल अंबुरे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
वाहतूक पोलिसांनी तत्परतेने बसचालकाला रिक्षात बसवून जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
वेळेत उपचार मिळाल्याने चालकाचे प्राण वाचले, पोलिसांच्या कृतीचे कौतुक करण्यात आले.
Pune PMPML Bus Driver Heart Attack : पुण्यात एका बस चालकाला पीएमपी बस चालवत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांना ही माहिती समजली. त्यांनी बसचालकाला रिक्षात बसवून रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने बसचालकाचे प्राण वाचले. या कृतीमुळे वाहतूक पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरुन पुणे स्टेशन ते कोथरुड-कुंबरे पार्क या मार्गावर एक पीएमपी बस निघाली होती. ही बस अनिल अंबुरे (वय ४१ वर्ष) चालवत होते. बेलबाग चौकात पोहोचल्यानंतर अनिल अंबुरे यांच्या छातीमध्ये दुखू लाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. चालकाची स्थिती पाहून बसमधील प्रवासी घाबरले.
त्यावेळेस रोमेश ढावरे आणि अर्चना निमगरे हे वाहतूक पोलीस कर्मचारी बेलबाग चौकात कार्यरत होते. प्रवाशांनी बसचालकाला हृदयविकाराचा झटका आल्याचे ढावरे आणि निमगरे यांना हाका मारून सांगितले. त्यानंतर दोघांनी बसचालक अनिल अंबुरे यांना बसमधून बाहेर काढले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.
गणेशोत्सव असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमामात गर्दी होती. गर्दीत रुग्णवाहिकेला पोहोचण्यास उशीर होऊ शकतो असे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना वाटले. तेव्हा दोघांनी बसचालक अंबुरे यांना रिक्षात बसवले आणि जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. यादरम्यान चालक अनिल अंबुरे बेशुद्ध पडले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अंबुरे यांच्यावर उपचार करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.