Maharashtra Today Weather News Saam Tv
देश विदेश

Weather Update: ३० राज्यांमध्ये पुढचे ६ दिवस पावसाचा हाहाकार, महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस?

Maharashtra Weather News: देशातील ३० राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे ६ दिवस या राज्यांसाठी महत्वाचे असणार आहेत. महाराष्ट्रासह पुढचे २ दिवस महत्वाचे असणार आहेत. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

Priya More
  • देशातील ३० राज्यांना पुढचे ६ दिवस पावसाचा इशारा

  • महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राहणार पाऊस

  • हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज

  • देशातील अनेक राज्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा

मान्सून पाऊस दाखल होण्यापूर्वीच देशामध्ये पावसाने हाहाकार केला आहे. देशातील अनेक राज्यात सध्या तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. पुढचे ५ दिवस देशातील २० राज्यांसाठी महत्वाचे असणार आहेत. या काळात वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर महाराष्ट्रासाठी देखील पुढचे २ दिवस महत्वाचे असणार आहे. प्रमुख शहरांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. देशात कोणत्या राज्यात कधी आणि कसा पाऊस पडणार हे आपण जाणून घेणार आहोत...

हवामान खात्याने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, मध्य भारतात पुढील ७ दिवस, पूर्व भारतात २३ ते २६ मे आणि उत्तर भारतात २४ ते २९ मे म्हणजेच सहा दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तसंच, दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडूमध्ये पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सून २६ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो. सध्या तो बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागात अंदमान आणि निकोबार बेटे इत्यादी ठिकाणी पुढे सरकत आहे.

ईशान्य भारतामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. २३ आणि २५ मे रोजी आसाम, मेघालयमध्ये तर २३ मे रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराममध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. २५ ते २७ मे रोजी अरुणाचल प्रदेशात, २६ मे रोजी आसाम आणि मेघालयमध्ये, तर २३ ते २४ मे रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्येही, २३ ते २६ मे रोजी केरळ, लक्षद्वीपमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. २६ मे रोजी कर्नाटक, २४, २६ आणि २७ मे रोजी दक्षिण कर्नाटक, २५, २६, २७ मे रोजी किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम, २४-२६ मे रोजी रायलसीमा, तर २३ ते २७ मे रोजी तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अंदमान आणि निकोबारमध्ये २३ ते २९ मे दरम्यान, तर पश्चिम बंगालमध्ये २३ ते २७ मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये २३ आणि २६ ते २९ मे रोजी, बिहारमध्ये २४, २८, २९ मे रोजी, तर ओडिशामध्ये २४ ते २७ मे रोजी पाऊस पडेल. २३ तारखेला ओडिशामध्ये वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतातील काही राज्यांमध्येही पाऊस पडणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये २३ ते २५ मे रोजी, हिमाचल प्रदेशात २३ आणि २९ मे रोजी, तर उत्तराखंडमध्ये २३ आणि २५ मे रोजी पाऊस पडण्याची शक्यात आहे. यावेळी सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे.

महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात उष्णतेची लाट असताना, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र गेल्या २ दिवसांपासून वादळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील २ दिवसांसाठी या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्याच्या पश्चिम भागात पावसाळी वातावरण तर पूर्व भागात म्हणजे विदर्भात तीव्र उष्णता असे चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याच्या सिंहगड घाटात भीषण अपघात; दुचाकी थेट दरीत कोसळली

Maharashtra News Live Update: आळंदीत माऊली मंदिरात दानावर सेवकाचा डल्ला

Saffron Milk Benefit: दररोज केशरच्या २ काड्या घातलेलं दूध प्या; तुमच्या शरीराला मिळतील हे आरोग्यदायी फायदे

Dapoli Tourism : समुद्राच्या लाटांसोबत शांततेचा आनंद, दापोलीतील 'हे' ५ समुद्रकिनारे विकेंडसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Chanakya Niti: ...अशा लोकांना घरी बोलवणं पडेल महागात, व्हाल बर्बाद

SCROLL FOR NEXT