Weather Update 28 March 2024 Saam TV
देश विदेश

Weather Forecast: वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात मोठा बदल; या भागात अवकाळी पाऊस अन् गारपिटीची शक्यता

Weather Update Today: येत्या २९ मार्चपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Satish Daud

Weather Update 28 March 2024

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीपार गेलाय. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र, लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो. कारण, पुढील तीन ते चार दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येत्या २९ मार्चपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी ईशान्य भारत आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.

त्याचवेळी, पश्चिम हिमालयाच्या वरच्या भागात हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर पंजाब आणि हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात तुरळक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.याशिवाय काही भागात जोरदार वादळे आणि सखल भागात गारपीट होण्याची शक्यता आहे.

छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, गंगेचे पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय लिकले राज्यांमध्ये पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज आहे. (Latest Marathi News)

इतर राज्यांपेक्षा जम्मू-काश्मीरला हवामानाच्या रोषाला अधिक सामोरे जावे लागणार आहे. श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. तर उत्तराखंडमध्येही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे.

स्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर देखील होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

SCROLL FOR NEXT