Water On Moon Saam Digital
देश विदेश

Water On Moon : चंद्रावरही मानवी वस्तीचा मार्ग मोकळा? चीनला सापडलं चंद्रावर पाणी, जमीनही पाणीदार

Sandeep Gawade

खगोल शास्त्रज्ञ आपल्या पृथ्वीसाखर वातावरण आणि पाणी असलेल्या गृहाच्या शोधात आहे. त्यात महत्त्वाचं म्हणजे आणि ते असेल तरच जीवन असण्याची शक्यता आहे. मंगळ, शनीचा चंद्र आणि आपल्या पृथ्वीच्या चंद्रावर कधीकाळी पाणी असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यातच आपल्या चंद्रावरून एक मोठी बातमी आहे. चंद्रावर चीनला पाणी सापडल्याचा दावा करण्यात आलायं...त्यामुळे चंद्रावर मानवी जीवन शक्य आहे का या उत्तराच्या आणखी जवळ जाण्यास मदत होणार आहे पाहूया....

पृथ्वीसारखीच सजीवसृष्टी परग्रहावर निर्माण होऊ शकते का याचं जगभरातून संशोधन सुरू आहे. त्यामुळेच कधी मंगळावर तर कधी चंद्रावर पाण्याबाबत चर्चा होते. आणि त्याचदृष्टीनं चंद्राच्या मातीतून पाणी वेगळं काढण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. चिनी शास्त्रज्ञांनी हे आगळं-वेगळं तंत्र विकसित केलंय. चीनने 2020 साली पार पडलेल्या चांग ई-5 या मोहिमेद्वारे

चंद्रावरची माती, दगड यांचे नमुने पृथ्वीवर आणले होते. हे नमुने हायड्रोजने समृद्ध असल्याचं आढळलं. ही माती अत्यंत उच्च तापमानात गरम केली असता त्यातल्या पाण्याची वाफ झाली, आणि अशा पद्धतीने चंद्राच्या मातीतून पाणी वेगळं करण्यात आलंय. चंद्रावरच्या तब्बल 1 टन मातीतून जवळपास 50 ते 70 लीटर पाणी काढता येते, असं या संशोधनात आढळलं आहे.

चंद्राचा पृष्ठभाग हा कोरडा आणि कडक आहे. मात्र आता चीनने चंद्रावरून आणलेल्या मातीवरून स्पष्ट झालंय की चंद्रावरील मातीत पाण्याचा अंश आहे. त्यामुळे ती माती ओलसर असू शकते. यातून असे देखील समोर आले की चंद्रावर पाणी हे केवळ बर्फ़ स्वरूपात उपलब्ध नाही.अपोलो मिशन अंतर्गत चंद्रावर गेलेल्या अमेरिकन अंतराळवीरांनी चंद्राच्या मातीचे नमुने आणले होते. यावरून शास्त्रज्ञांनी चंद्राची माती ही कोरडी असल्याचा निष्कर्ष काढला होता. याला नासाने सुद्धा पाठिंबा देत चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याची कमतरता असल्याचे सांगितले होते. मात्र आता तब्बल 40 वर्षांनी हा दावा फोल ठरून चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.यापूर्वी 2009 रोजी भारताच्या चांद्रयान 1 ने चंद्रावर पाणी असल्याचे संकेत दिले होते. भारताच्या यानाने चंद्रावरील हाइड्रेटेड खनिजांचा शोध लावला होता.

चंद्रावर कायमची वस्ती करण्यायोग्य सुविधा उभारणीसाठी चीनने काही मोहिमा आखल्या आहेत. त्यासाठी हे संशोधन महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काय काय शोध लागतात आणि मुळात चंद्रावर माणूस राहू शकणार का याबाबतचं कुतुहल आणखीनच वाढलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT