Crime News, saam tv
देश विदेश

Crime News: प्रेयसीसोबत करायचं होतं लग्न, विरोध करणाऱ्या वडिलांना संपवलं; पुढे काय झालं?

मुलाने वडिलांचा मृतदेह गोणीत भरून उसाच्या शेतात लपवून ठेवला होता.

साम टिव्ही ब्युरो

लखनौ : प्रेमात सगळं काही माफ असतं, असं बोलतात. मात्र याचा शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बागपत येथील एका तरुणाने प्रेमप्रकरणातून वडिलांचीत हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वडिलांनी मुलाला प्रेयसीसोबत लग्न करण्यास मनाई केली होती. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर मुलाने हातात काठी घेऊन वडिलांवर हल्ला केला. या हल्ल्यात वडील सुदेशपाल यांचा मृत्यू झाला. यानंतर मुलाने वडिलांचा मृतदेह गोणीत भरून उसाच्या शेतात लपवून ठेवला होता. (Crime)

बागपतच्या शाबका गावात राहणाऱ्या सुदेशपाल यांच्या पत्नीने छपरौली पोलीस ठाण्यात पती सुदेशपाल बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुदेशपालचा शोध घेतला असता, १८ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तपास सुरू केला असता एका आरोपीला अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेला आरोपी दुसरा कुणी नसून सुदेशपाल यांचा मोठा मुलगा गौरव आहे. पोलिसांनी गौरवकडे चौकशी केली असता हत्येचं कारणही उलगडले आहे.

छपरौली कोतवाली प्रभारी नितीन पांडे यांनी सांगितले की, १६ ऑक्टोबरला गौरव पेपर देऊन घरी आला. यावेळी त्याच्यासोबत त्याची मैत्रीणही होती. गौरवने लग्नाबाबत बोलले असता वडिलांनी लग्नास नकार दिला. त्याने सांगितले की, त्याचे वडील सकाळी फिरायला जायला निघाले तेव्हा दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाला. यानंतर गौरवने काठी घेऊन वडिलांच्या डोक्यावर हल्ला केला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हत्येची माहिती कोणाला कळू नये म्हणून त्याने वडिलांचा मृतदेह गोणीत भरून उसाच्या शेतात टाकला. गावकऱ्यांनी सांगितले की, कुटुंबातही सर्व काही ठीक चालले नव्हते, त्यामुळे ते नाराज होते. सोबतच मुलाची प्रेमविवाह करण्याची इच्छा त्यांना सतावत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care Drink: थंडीत नक्की प्या हे हेल्दी ड्रिंक, होणार नाहीत सर्दी खोकला ताप सारखे आजार

Pune : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला जामीन; नेमकं काय प्रकरण? जाणून घ्या

Winter Picnic Travel : कडाक्याच्या थंडीत मुंबईतील या ठिकाणांना द्या भेट, विकेंडला करा खास कुटुंबासोबत पिकनीक प्लान

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

ZP Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी जाहीर होणार? महत्त्वाची माहिती समोर आली

SCROLL FOR NEXT