Viral Video Boys In Skirt Viral Video
देश विदेश

Viral Video Boys In Skirt : पोरं बिथरली! चक्क स्कर्ट घालून तरुणांची मेट्रोमध्ये एन्ट्री; पुढे घडलं असं काही VIDEO तुफान VIRAL

Delhi Metro Train Boys In Skirt : या व्हिडिओमध्ये दोन तरुण मुलं चक्क स्कर्ट घालून ट्रेनमध्ये चढलेत.

Ruchika Jadhav

Delhi Metro Train : ट्रेन आणि ट्रेनमधील प्रवाशी यांचे अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. ट्रेनमध्ये बसण्याच्या जागेवरून महिलांचे हाणामारीचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत व्हायरल झाले आहेत. अशात तरुण मुलं काय अतरंगीपणा करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. सध्या दिल्ली मेट्रोचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण मुलं चक्क स्कर्ट घालून ट्रेनमध्ये चढलेत. (Boys In Skirt)

ट्रेनमध्ये स्कर्ट घालून आलेल्या या तरुणांना पाहून प्रवाशी देखील थक्क झालेत. मुलांची अनोखी फॅशन पाहून काही व्यक्ती तर या दोघांकडे एकटक पाहत राहिले होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोघांनी डेनीअमचे स्कर्ट घातले आहेत.

त्यांचा हा अवतार पाहून काहीजण खळखळून हसत आहेत. अशात ही मुलं अशी अतरंगी फॅशन करून एवढ्यावरच थांबलेली नाहीत. यापुढे त्यांनी स्टेशन परिसरात धुमाकूळ घातलाय.

हे दोघेही एकमेकांचे मित्र असल्याचे समजले आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काहीतरी अतरंगी करता यावं म्हणून या दोघांनी थेट मुलींचे कपडे घालण्यास सुरूवात केली. टी-शर्ट, स्कर्ट, डोळ्यांमध्ये गॉगल आणि पायात श्यूज घालून संपूर्ण स्टेशनवर ही मुलं स्वॅगमध्ये फिरताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर @_bhavyakuma या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. १६ एप्रिल रोजी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. व्हिडिओला ३४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच २ लाखांहून अधिक व्ह्यूव्ज या व्हिडिओला मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे कार अपघातात निधन; २४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीत विश्वावर शोककळा

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २ दिवसात हे काम कराच अन्यथा पीएम किसानचे ₹२००० बंद होणार

Maharashtra News Live Update: आज पुणे स्टेशनवरून एकही लोकल सुटणार नाही

३२ वर्षीय बायकोचे शिक्षकासोबत अफेअर; ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, नागपुरातील धक्कादायक घटना

Gayatri Datar Mangalsutra Design: शिव-शक्तीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं! गायत्री दातारच्या 'दोन वाट्यांच्या' मंगळसूत्राने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT