Car Can Run On Water Viral Video : गाडी पाण्यावर चालत नाही, हे आपण नेहमी ऐकत आलोय. पण सोशल मीडियावर सध्या इराणच्या एका वैज्ञानिकाचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् सोशल मीडियावर वाद, चर्चा उफळल्या आहेत. ६० लिटर पाण्यात ९०० किमी कार धावू शकते, असा दावा करणारा इराणच्या वैज्ञानिकाचा व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. पण यात नेमकं किती तथ्य आहे? व्हायरल होणारा व्हिडिओ खरा आहे का? याबाबत जाणून घेऊयात..
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत पाण्यावर धावणारी कार आली असल्याचा दावा केला आहे. इराणचा वैज्ञानिक अलाअद्दीन कासेमी याने पेट्रोल, डिझेल, गॅस नव्हे तर पाण्यावर धावणाऱ्या कारचा अविष्कार केल्याचा दावा व्हिडिओत करण्यात आला आहे. ऐकूण थक्क झालात ना? इतकेच नाही तर ६० लिटर पाण्यामध्ये जवळपास १० तास म्हणजे ९०० किमीपर्यंत कार धावू शकते, असे वैज्ञानिकाने दावा केला आहे. पण अलाअद्दीन कासेमी यांच्या या दाव्यावर दुसऱ्या अनेक वैज्ञानिकांनी संशय व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
पाण्यावर कार धावणाऱ्या दाव्याचा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर @ShivrattanDhil1 या खात्यावर पोस्ट करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला, त्या दिवसापासून नेटकऱ्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलाय तर १३ हजारांपेक्षा जास्त युजर्सने रिपोस्ट केलेय. लाईक्स अन् कमेंट्सचाही पाऊस पडला आहे.
एका इराणी शास्त्रज्ञाने फक्त पाण्यावर चालणारी कार तयार केल्याचा दावा केला आहे. ही कार पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन करते आणि नंतर इंजिनला शक्ती देण्यासाठी हायड्रोजन जाळते, असा दावा केलाय. ही कार ६० लिटर पाण्यात ९०० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते असाही दावा केलाय.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याबाबत Grok कडे उत्तर विचारले. हा व्हिडिओ अलाएद्दीन कासेमी यांच्या २०१६ मध्ये पाण्यावर चालणाऱ्या कारच्या प्रात्यक्षिकेशी संबंधित आहे. तेहरान टाईम्स आणि प्रेस टीव्ही ही बातमी कव्हर केली होती. पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन करून वीज निर्माण करते आणि कोणतेही प्रदूषण न करता ६० लिटर पाण्यातून ९०० किलोमीटर प्रवास करते, असे बातमीत म्हटले होते असे Grok ने उत्तर दिले.
पाण्यावर कार धावते, या दाव्यात तथ्य वाटत नाही. कारण हे नियमांच्या विरोधात आहे. विज्ञानानुसार पाणी विभाजित करण्यासाठी लागणारी ऊर्जा हायड्रोजनपासून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा जास्त आहे. तसेच यासंदर्भातील कोणत्याही पेटंटबाबतची माहिती उपलब्ध नाही. व्हिडिओमध्ये एक लहान ड्राइव्ह दाखवली आहे, परंतु हे प्रत्यक्षात शक्य आहे की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
पाण्यापासून इंधनासाठी हायड्रोजन तयार करण्याची प्रक्रिया ऊर्जा-केंद्रित आहे. पण त्यासाठी विशेष उपकरणे आवश्यक आहेत. कार हायड्रोजनवर धावू शकते, पण फक्त पाण्यावर नाही, असे एका लेखात म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.