Israel Strike on Iran: इस्त्रायलचा इराणवर भीषण हल्ला; इराणची राजधानी तेहरान उद्धवस्त?

Israel Hits Iran Capital : रशिया युक्रेन युद्धानंतर आता जगात आणखी एक भीषण युद्ध भडकलंय.अमेरिका आणि इस्त्राईलनं इराणवर हल्ला केलाय. मात्र अमेरिका आणि इस्त्रायलनं इराणमधील कोणत्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत..पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Israel Hits Iran Capital :
Smoke rises over Tehran after reported missile strikes during a joint US–Israel operation targeting key Iranian centers.saam tv
Published On
Summary
  • अमेरिका-इस्त्रायलच्या संयुक्त कारवाईत तेहरानवर क्षेपणास्त्र हल्ला.

  • इराणच्या प्रमुख केंद्रांना लक्ष्य केल्याचा दावा.

  • अल्टिमेटमनंतर कारवाई झाल्याची चर्चा.

Summary

रोहित कदम, साम प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वीच अल्टिमेटम दिल्यानंतर अमेरिका-इस्त्रायलच्या संयुक्त कारवाईत इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय.संयुक्त कारवाईत इराणच्या प्रमुख केंद्रांना लक्ष्य केलंय.

Israel Hits Iran Capital :
Iran Vs US: अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचं प्रत्युत्तर; अमेरिकेचे एअरबेस उद्ध्वस्त

इराणच्या या ठिकाणांना केलं लक्ष्य

संरक्षण मंत्रालय

गुप्तचर मुख्यालय

सर्वोच्च नेते खोमेनी यांचे कार्यालय

इराणची अणुऊर्जा(एटॉमिक एनर्जी ऑफ ईरान)

पर्चिन

Israel Hits Iran Capital :
इराणवर अमेरीकेचा समुद्रातून वार; USS अब्राहम लिंकन युद्धनौका विध्वंस घडवणार?

इस्त्रायलच्या हल्ल्याला इराणनेही चोख प्रत्युत्तर दिलंय.. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने मेडिकल आणीबाणी जाहीर करत सर्व रुग्णालयांना 'इमर्जन्सी प्रोसिजर' राबविण्याचे तातडीचे आदेश दिलेत.

इस्रायलमधील रुग्णालयांना 'इमर्जन्सी प्रोसिजर' राबविण्याचे आदेश

इस्त्रायलमधील नागरिक तेल अवीवमधील बंकरच्या दिशेने

इस्रायलच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्रांमुळे जोर्डनच्या हद्दीतही भीतीचे वातावरण.

विशेष म्हणजे, जिनिव्हा येथे अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत चर्चा सुरू असतानाच हा हल्ला करण्यात आलाय...अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनालड ट्रम्प यांनी दिलेली 10 ते 15 दिवसांची मुदत संपताच इराणच्या वर्मी घाव घालून इस्त्रायलने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिलीय... यास इराणकडून केला गेलेला प्रतिहल्ला यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होऊन जागतिक तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून निघणार, हे मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com