इराणवर अमेरीकेचा समुद्रातून वार; USS अब्राहम लिंकन युद्धनौका विध्वंस घडवणार?

US - Iran War: आतापर्यंत इराणवर दबाव टाकण्यासाठी पाठवलेल्या युएसएस अब्राहम लिंकन या युद्धनौकेच्या माध्यमातून इराणवर अमेरिकेनं समुद्रातून वार केलाय. मात्र ही युद्धनौका किती विध्वंसक आहे...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
US - Iran War:
USS Abraham Lincoln aircraft carrier deployed in regional waters amid escalating tensions between the US and Iran.saam tv
Published On

हा विध्वंसक हल्ला अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन या युद्धनौकेतून झालाय.आणि याच हल्ल्यानं इराणमध्ये हाहाकार माजलाय. आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प हे इराणला धमक्या देत होते.. एवढंच नाही तर अमेरिकेची सर्वात विनाशकारी युद्धनौका USS अब्राहम लिंकन पाठवून युद्धाचा अलार्म वाजवण्यात आला होता. ही युद्धनौका इराणच्या समुद्रात दाखल झाली अन् थेट इराणवर हल्ला करत ट्रम्प यांनी युद्धाला तोंड फोडलंय. मात्र USS अब्राहम लिंकन या युद्धनौकेचं वैशिष्ट्ये काय आहे. पाहूयात.

US - Iran War:
इस्त्रायल-अमेरिकेच्या निशाण्यावर अयातुल्ला अली खामेनेई; आधी धमकी आता थेट घरावर हल्ला

USS अब्राहम लिंकन ही अमेरिकेची अण्वस्त्रसज्ज युद्धनौका आहे. या युद्धनौकेचं आकारमान 333 मीटर इतकं मोठं आहे. त्यावर 5 ते 8 हजार सैनिक राहू शकतात. त्यावर F/A-18, F-35C यांसारखी 75 हून अधिक क्षेपणास्त्रसज्ज विमानं तैनात करण्याची क्षमता आहे... बी 2 स्टेल्थ बॉम्बर ही लढाऊ विमानंही युद्धनौकेवर सज्ज आहे. एवढंच नाही तर या युद्धनौकेवर USS नॉरफॉक ही अण्वस्त्रसज्ज पानबुडी आहे.. ही पानबुडी गुप्तपणे हालचाल करु शकते. रडारला चकवा देणारी यंत्रणा आणि अत्यंत शक्तीशाली हवाई संरक्षण यंत्रणा आहे.

US - Iran War:
Iran-US-Israel Conflict: आता विनाश अटळ! धमकीनंतर इराणकडून अमेरिकेच्या तळांना लक्ष्य; युएई, कतार, कुवेत, बहरीनवर हल्ले

आता अमेरिकेनं अब्राहम लिंकन या युद्धनौकेतून इराणवर हल्ला करत खळबळ उडवून दिलीय.. त्यामुळे इराणही आता जोरदार पलटवार करण्याची शक्यता आहे... मात्र युएसएस अब्राहम लिंकन या युद्धनौकेतून इराणवर भीषण हल्ल्यांचा सपाटा सुरुच राहिल्यास इराणमध्ये विध्वंस घडण्याचीच शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com