Iran-US-Israel Conflict: आता विनाश अटळ! धमकीनंतर इराणकडून अमेरिकेच्या तळांना लक्ष्य; युएई, कतार, कुवेत, बहरीनवर हल्ले

Iran-US-Israel Conflict Escalates: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर मध्यपूर्वेतील तणाव वाढला आहे. तेहरानने मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. युएई, कतार, कुवेत आणि बहरीनसह आखाती प्रदेशातील अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यात आले.
Smoke rises over Tehran following reported airstrikes amid escalating tensions between Iran, the United States, and Israel.
Smoke rises over Tehran following reported airstrikes amid escalating tensions between Iran, the United States, and Israel.saam tv
Published On
Summary
  • अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांनंतर इराणचा तीव्र इशारा.

  • तेहरानसह अनेक शहरांवर हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचे वृत्त.

  • इराणने अमेरिका आणि इस्रायलला कठोर प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली.

इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला असून अमेरिका आणि इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध पेटलंय. इ्स्रायल आणि अमेरिका यांनी शनिवारी संयुक्तपणे इराणने अनेक शहरांना लक्ष्य करून मोठा लष्करी हल्ला केला, ज्यामुळे मध्य पूर्वेमध्ये तणाव निर्माण झाला. इस्रायलने याला पूर्वसूचना म्हणून म्हटलंय. यानंतर इराणने दोन्ही देशांना धमकी देत आता विनाश असल्याचं म्हटलंय.

Smoke rises over Tehran following reported airstrikes amid escalating tensions between Iran, the United States, and Israel.
US Iran tensions : शस्त्र टाका, नाहीतर मृत्यूचा सामना करा! अमेरिकेचा इराणला थेट इशारा; ट्रम्प म्हणाले...

अमेरिका आणि इस्रालयकडून करण्यात आलेले हल्ले, वृत्तानुसार, तेहरान, इस्फहान, कोम आणि खोरमाबादसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले करण्यात आले. तेहरानच्या युनिव्हर्सिटी स्ट्रीट परिसरात, सर्वोच्च न्यायालय आणि न्याय मंत्रालयाजवळ स्फोट झाला. हल्ल्यांमध्ये इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे घर लक्ष्य करण्यात आले.

इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इराणने इस्रायल आणि अमेरिकेला धमकी दिली आहे. तुम्ही युद्ध सुरू केले, पण आम्ही ते संपवू. हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू आहे आणि लवकरच दोघांनाही योग्य उत्तर दिले जाईल. आम्ही इतके क्षेपणास्त्रे डागू की अमेरिका आणि इस्रायलला कुठलेही क्षेपणास्त्र कुठे रोखायचं असा प्रश्न पडेल.

इराणी संसदेतील राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या प्रमुखांनी म्हटलं की, इस्रायलने अशा मार्गावर चालायला सुरुवात केली आहे, ज्याचा अंत त्याच्या हातात नाही, परंतु इराण ते संपवेल. त्याचे परिणाम अमेरिकेलाही भोगावे लागतील. इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष अली खामेनेई यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला केला. इस्रायलने तेथे अंदाजे सात क्षेपणास्त्रे डागली, परंतु राष्ट्राध्यक्ष पूर्णपणे सुरक्षित आहेत.

Smoke rises over Tehran following reported airstrikes amid escalating tensions between Iran, the United States, and Israel.
Israel Attacks On Iran: इस्राइलचा इराणवर मोठा हल्ला, तेहरानसह ३० ठिकाणी भीषण स्फोट; आणीबाणीची घोषणा

तिन्ही देशातील परिस्थिती बिघडत चालली आहे. इ्स्रायल आणि अमेरिकेकडून होणारी हल्ले पाहून इराणने आपले संपूर्ण हवाई क्षेत्र बंद केले आहे. इस्रायलने आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे आणि रहिवाशांना त्या ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कतारमधील अमेरिकन दूतावासानेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वृत्तानुसार इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील अमेरिकन हवाई तळ अल धफ्रा वर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. हल्ल्यानंतर परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती झपाट्याने बिघडत असताना, कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. अल अरेबियाच्या प्रतिनिधीनुसार, बहरीनमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले. कतारमधील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना तात्काळ शहराबाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com