UBT Shiv Sena attacks Election Commission ahead of elections : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे समोर आले. त्यावर संजय राऊतांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. भाजपवर टीका करताना राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले. भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी मान आहे ऐसा कोई सगा नही जिसको भाजपने ठगा नही. ऐसा कोई सगा नाही जिसको बीजेपी ने ठगा नही. अजित पवार किस झाड की मुली.. असे म्हणत राऊतांनी टीकेचा बॉम्ब फोडला.
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'सत्ताधारी पक्षाचे आमदारच पैसे खाऊन अधिकाऱ्यांनी दुबार मतं टाकल्याचं सांगत आहेत,' असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. त्यांनी राज्यात तब्बल ९६ लाख बोगस मतदार असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बेलापूर, नाशिक, पैठण आणि बुलढाण्यातील आकडेवारी सादर करत त्यांनी हा घोटाळा पुराव्यासह मांडला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऍटमबॉम्ब'च्या विधानाची 'भाऊबंदकी' नाटकाशी तुलना करत त्यांनी टीका केली. येत्या २७ तारखेला उद्धव ठाकरे मुंबईतील उपशाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार असून, निवडणुकांसाठी पक्ष कामाला लागल्याचेही त्यांनी सांगितले. हा सर्व प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या असून निवडणूक आयोगाने भाजपचे वकील असल्यासारखे वागू नये, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.