Snake
Snake  saam Tv
देश विदेश

Snake In Bed: बापरे! बेडवर 6 फुटांचा विषारी साप फणा वासून बसला होता; महिलेनं चादर उचलताच...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Snake Viral News : साप नुसता नजरेस पडला तरी अनेकांचे पाय लटपटतात, हात थरथरतात...हृदयाचे ठोके वाढतात. पण बेडरूममध्ये पलंगावर अंथरूणात साप शिरला तर...? हा अनुभव एका महिलेला आलाय. ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँडमध्ये ही घटना घडलीय.

अंथरूणात शिरलेला साप एक-दोन नव्हे तर चक्क सहा फुटांचा होता, तोही विषारी. हा भलामोठा साप बघून महिलेला चांगलाच धक्का बसला. ही महिला बेडरूममध्ये पलंगावरील चादर बदलण्यास गेली होती. त्यावेळी चादरीच्या खाली हा विषारी साप बसला होता. (Viral News)

ही महिला (Woman) सुरुवातीला घाबरली. पण त्यानंतर लगेच तिनं स्वतःला सावरलं. तिनं बेडरूमच्या बाहेर धूम ठोकली आणि दरवाजा पटकन बंद करून घेतला. साप (Snake) घरातून निघून जाऊ नये म्हणून दरवाजाच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत टॉवेल लावला. त्यानंतर सर्पमित्राला फोन करून माहिती दिली.

Snake

सर्पमित्रानं सांगितलं की, ज्यावेळी मी पोहोचलो, तेव्हा संबंधित महिला घराबाहेर माझी वाट बघत बसली होती. मी त्या बेडरूमच्या दिशेने गेलो. दरवाजाखाली टॉवेल लावलेला होता. मी दरवाजाला धक्का दिला आणि ते उघडलं. जवळपास सहा फुटांचा साप अंथरूणात होता. (Snake Viral News)

सर्पमित्रानं त्याच्या फेसबुक पेजवर या सापाचे फोटो शेअर केले आहेत. गरमीपासून बचाव करण्यासाठी साप दरवाजातून खोलीत गेला असावा. या दिवसांत बाहेर खूप गरमी आहे. त्यामुळेच तो या ठिकाणी आला असावा, असे त्याने सांगितले.

दरम्यान, या सापाला पकडल्यानंतर सर्पमित्राने त्याला जंगल परिसरात सोडून दिले. प्रसंगावधान दाखवल्याबद्दल त्या महिलेचेही त्याने कौतुक केले. या महिलेसारखेच प्रसंगावधान दाखवायला हवं, असा सल्लाही त्याने इतर महिलांसह शेजारच्यांना दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi : स्पृहा जोशीचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, 'या' वेबसीरीजमध्ये साकारली प्रमुख भूमिका

Narayan Rane : सत्ता गेल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

MI vs KKR, Toss Prediction: टॉस ठरेल बॉस! KKR ला हरवण्यासाठी मुंबईने आधी काय करावं?

Today's Marathi News Live : राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेच्या वेळेत बदल, सभास्थळी ६.३० वाजता येणार

Share Market Today : शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १४०० अंकानी घसरला, झटक्यात गुंतवणूकदारांचे ३ कोटी बुडाले

SCROLL FOR NEXT