Businessman married to 16-year-old girl saam tv
देश विदेश

Businessman Wedding: 65 वर्षीय बिजनेसमनने 16 वर्षाच्या मुलीसोबत थाटला संसार, आधीच्या 5 बायकांपासून आहेत 16 मुलं

Businessman married to 16-year-old girl: एखाद्या ६० वर्षाच्या वृद्धाने १६ वर्षांच्या तरुणीशी लग्न केल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? नसेल ही बातमी वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

Chandrakant Jagtap

Hissam Hussein Dehaini married to 16-year-old girl: वव्यात खूप मोठं अंतर असलं तरी एकमेकांसोबत साताजान्माच्या गाठी बांधलेली अनेक उदारहणं तुम्ही पाहिली असतील. अनेक सेलिब्रिटिंनी देखील वय न बघता एकमेकांसोबत संसार थाटल्याचे उदाहरण आपल्यासमोर आहेतच. परंतु एखाद्या ६० वर्षाच्या वृद्धाने १६ वर्षांच्या तरुणीशी लग्न केल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? नसेल ही बातमी वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कारण ब्राझीलमधील एका ६५ बिजनेसमनने चक्क एका १६ वर्षांच्या तरुणीशी लग्न केले आहे.

आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ब्राझिलियन व्यावसायिकाचं नाव हिसाम हुसैन देहानी (Hissam Hussein Dehaini) आहे. देहानी हे ब्राझीलमधील एका शहराचे महापौर देखील आहेत. त्यांनी नुकताच एका १६ वर्षाच्या मुलीशी विवाह केला आहे.

चाइल्ड ब्युटी क्वीनशी केला विवाह

विशेष म्हणजे ही मुलगी चाइल्ड ब्युटी क्वीन राहिलेली आहे. नुकतेच तिने हे विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर देहानी यांची नजर या तरुणीवर पडली आणि तिला पाहताच ते तिच्या प्रेमातच पडले. यानंतर तिच्याशी लग्न करण्यासाठी देहानी यांनी सर्व अडथळे दूर केले. नुकतेच १५ एप्रिल रोजी त्यांचे लग्न झाले. काऊने रोडे कॅमार्गो (kauane rode camargo) असे या मुलीचे नाव आहे.

पाच वेळा लग्न, १६ मुलांचा पिता

आश्चर्याची बाब म्हणजे देहानी यांनी याआधीही अनेक वेळा लग्न केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार या व्यावसायिकाने याआधी ५ वेळा लग्न केले असून त्यांना १६ मुलं देखील आहेत. त्यांचे पहिले लग्न १९८० मध्ये झाले होते. त्यांना २००० साली एकदा अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटकही झाली होती असा असाही दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. देहानी हे १४ दशलक्ष ब्राझिलियन रिअल किमतीच्या मालमत्तेचे मालक आहेत. त्याच्या लग्नाच्या वेळी ते पराना राज्यातील अराकुरिया येथे महापौर म्हणून दुसऱ्या टर्म कार्यरत होते. (Viral News)

लग्नासाठी पदाचा राजीनामा दिला...

दरम्यान या दोघांच्या लग्नाला अनेक लोकांनी विरोध केला होता. सामाजिक क्षेत्रात काम करत असलेली व्यक्ती अशा प्रकारचे उदारहण समोर ठेवत असल्याने त्याचा समाजावर विपरित परिणाम होईल अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती. लग्नाला झालेल्या विरोधामुळे देहानी यांनी आपल्या पक्षाचाही राजीनामा दिला. एवढंच नाही तर त्यांनी लग्नाआधी १६ वर्षीय वधूच्या काही नातेवाईकांना त्यांच्या व्यवसायात नोकरीही दिली. सध्या सोशल मीडियावर या नव्या कपल्सचे अनेक फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT