Baharon Phool Barsao Viral: शेतात काम करताना आजीने गायलं 'बहारों फूल बरसाओ', गाणं ऐकून तुम्हीही म्हणाल व्वा!

Old Lady Sings Baharon Phool Barsao song: ही आजी शेतात काम करताना गाणं गात आहे. तिने तिच्या खास शैलीत गायलेलं गाणं ऐकून नेटकरी भारावले आहेत.
Old Lady Singing song:
Old Lady Singing song:saam tv
Published On

Old Lady Singing song: सोशल मीडियाच्या माध्यमातून एकापेक्षा एक टॅलेंट समोर येत आहेत. रानू मंडल, सहदेव दिर्डो आणि भुबन बद्यकर ही त्याची उदाहरणे आहेत. अलीकडेच बिहारचा रहिवासी असलेल्या अमरजीतला सोशल मीडियाच्या माध्यमातून गायनातही ओळख मिळाली. आता एका आजीचा व्हिडीओ समोर आला आहे.

ही आजी शेतात काम करताना गाणं गात आहे. तिने तिच्या खास शैलीत गायलेलं गाणं ऐकून नेटकरी भारावले आहेत. आजीने गायलेलं हे गाणं ऐकून संपूर्ण इंटरनेट इम्प्रेस झालं आहे. या आजीने 1966 मध्ये आलेल्या 'सूरज' चित्रपटातील 'बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है' हे गाणं गायलं आहे.

Old Lady Singing song:
EXPLAINER: शरद पवारांच्या राजीनाम्याचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार?

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वृद्ध महिला शेतात काम करत आहे. तिथे काम करतानाही ती 'बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है' गुणगुणत आहे. या आजीने ज्या आत्मविश्वासाने गाणं गायलं त्याचं सर्वजण कौतुक करत आहेत. हे मूळ गाणं महान गायक मोहम्मद रफी यांनी गायलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. (Viral Video)

येथे पाहा व्हिडिओ...

Old Lady Singing song:
Mumbai Crime News: माजी नगरसेवकावर अत्याचाराचा गुन्हा; राजकीय वर्तुळात खळबळ

हा व्हिडिओ आयपीएस विवेक राज सिंह फॅन नावाच्या फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'अप्रतिम.' एका यूजरने यावर प्रतिक्रिया दिली आहे, 'आई तुझे ऐकल्यानंतर वाटले की नशीब नावाची एक गोष्ट आहे, जी कर्मापेक्षा कितीतरी पटीने मोठी असते. तुम्ही देवी सरस्वतीची पूजा आहा.' दुसऱ्या एका यूजरने 'अद्भुत आजी' अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com