EXPLAINER: शरद पवारांच्या राजीनाम्याचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar resigns as NCP chief: राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांचा दर्जा भीष्म पितामहांचा आहे. ते देशाचे कृषिमंत्री आणि संरक्षण मंत्रीच राहिलेले आहेत. शिवाय देशाच्या राजकारणावर त्यांची पकड आणि विरोधी नेत्यांमध्ये त्यांची मान्यता सर्वांना परिचित आहे.
Karnataka Election News
Karnataka Election NewsSaam TV

Sharad Pawar resignation Effect on Maharashtra And National Politics : महाराष्ट्राचं राजकारण सध्या प्रचंड अनिश्चिततांनी भरलेलं आहे. राज्यातलं राजकारण सध्या ज्या वळणावर आहे, तेथून पुढे काय होऊ शकतं हा अंदाज वर्तवणं भल्या भल्या राजकीय तज्ज्ञांच्या आवाक्यातली बाब राहिलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकिय नेत्यांकडून राज्यात भूकंप होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर राज्यात सत्तापालट होणार अशी चर्चा रंगली होती. या चर्चेत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. परंतु तेव्हा असा एखादा भूकंप होईल असं कोणाच्या डोक्यातही आलं नसेल.

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी १५ दिवसांत राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज शरद पवारांनी अचानक पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पवारांच्या या राजीनाम्याचा परिणाम केवळ राष्ट्रवादी पक्षापुरताच मर्यादित नसेल तर त्याचा दुरगामी परिणाम राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर देखील होऊ शकतो हे राजकारणाची जाण असलेला कोणताही सामान्य माणूस आत्मविश्वासाने सांगू शखतो.

Karnataka Election News
Supriya Sule Statement: सुप्रिया सुळेंचं ते वक्तव्य! १५ दिवसांत दोन राजकीय स्फोट; पहिला शरद पवारांची निवृत्ती, दुसरा कोणता?

मुंबईतील वाय बी सेंटरमध्ये आज शरद पवारांचं आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगती' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा होता. या सोहळ्यात शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. पवारांच्या या घोषणेने या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. शरद पवार यांनी राज्यसभा खासदार म्हणून उर्वरित तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचेही स्पष्ट केले.

शरद पवारांनी हा निर्णय अचानक घेतला की गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मनात हा विचार सुरू होता, ही गोष्ट हळूहळू समोर येईल. शरद पवारांच्या या राजीनाम्याचा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? आणि भाजपवर या निर्णयाचा काय परिणाम होईल असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

राष्ट्रीय राजकारणात भीष्म पितामहांचा दर्जा

राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांचा दर्जा भीष्म पितामहांचा आहे. ते देशाचे कृषिमंत्री आणि संरक्षण मंत्रीच राहिलेले आहेत. शिवाय देशाच्या राजकारणावर त्यांची पकड आणि विरोधी नेत्यांमध्ये त्यांची मान्यता सर्वांना परिचित आहे. पवारांना देशाची राजकारणाचं आकलन किती खोलवर आहे याचं उदारण नुकतंच पाहायला मिळालं होतं.

काँग्रेसने विरोधी ऐक्यासाठी बैठका घेण्यास सुरुवात केली तेव्हा मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यासमोर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पवारांनी स्पष्ट केलं होतं की, भाजपला पराभूत करणं अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि के चंद्रशेखर राव यांना सोबत घेतल्याशिवाय शक्य आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यापासून ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि के चंद्रशेखर राव अशा बड्या नेत्यांनी अनेकदा पवारांशी चर्चा केली आहे.

Karnataka Election News
Sharad Pawar Resigns: शरद पवार आपल्या निर्णयाचा फेरविचार करणार; अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

देशात भाजपविरोधी आघाडीचं काय होणार...?

ममता बॅनर्जी आणि केसीआर यांनी बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस आघाडी स्थापन करण्याची मोहिम सुरू केली तेव्हा शरद पवारांनी त्यांना देशात काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय भाजपला विरोधकांकडून आव्हान देता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. शरद पवारांची ही राजकीय समज नितीशकुमार यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याला समजली आणि ते अरविंद केजरीवाल यांना भेटायला गेले आणि विरोधी ऐक्याचे प्रयत्न पुढे नेण्यास सुरुवात केली. पवार राजकारणात सक्रिय नसतील तर देशात विरोधक एकत्र येण्याची मोहीम आणखी कठीण होऊ शकते.

राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 पूर्वी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येईल असे कोणालाही वाटले नसेल. पण शरद पवारांच्या पुढाकाराने ते घडलं आणि राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतरही हे तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांचं टिकेल का अशा सवाल अनेकांच्या मनात होता.

परंतु महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी ते जोडून ठेवले. सत्ता गेल्यानंतरही महाविकासआघाडी भक्कमपणे वज्रमुठ करून भाजपशी लढत आहे. पण आता पवार राष्ट्रवादीची धुरा दुसऱ्या कुणाच्या खांद्यावर सोपवणार असतील तर महाविकास आघाडीचं काय होणार आणि राष्ट्रवादीची पुढील वाटचाल नेमकी कशी असेल असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Karnataka Election News
Rahul Gandhi News: मोठी बातमी! 'मोदी आडनाव' बदनामी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

राष्ट्रवादी भाजपशी जवळीक साधणार...?

शरद पवारांनी राजीनामा दिल्यास अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होतील अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. अजित पवारांची भाजपशी जवळीक लपून राहिलेली नाही. शिवाय गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा देखील आहेत. अशा परिस्थितीत अजित पवार पक्षाचे अध्यक्ष बनले तर ते भाजपसोबत जाऊन पक्षातील नेत्यांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न करू शकतात अशी देखील एक शक्यता राजकीय जाणकरांच्या तोंडून वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीचं काय होणार...?

ठाकरे गटाला राष्ट्रवादीशी जोडून ठेवणाऱ्या संजय राऊत हे आतापर्यंत शरद पवारांच्या सल्ल्याने चालत होते. आता ते अजित पवारांच्या मताला प्राधान्य देतील का किंवा अजित पवार महाविकासआघाडी भक्कम ठेवण्यासाठी काम करतील की दुसरा एखादा पर्याय निवडतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. दुसरीकडे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचं महाविकास आघाडीत पक्षाचं अस्तित्वच नाहीसं होतं असल्याचं मत आहे. अशा परिस्थितीत महाविकासआघाडीला एकत्र ठेवणारा पवारांसारखा मुत्सद्दी नेता निर्णय प्रक्रियेतून बाजूला होत असेल तर महाविकासआघाडीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Maharashtra Political News)

Karnataka Election News
Sharad Pawar Retirement Speech: निवृत्तीची घोषणा करताना काय म्हणाले शरद पवार? वाचा भाषणातील प्रमुख मुद्दे

राष्ट्रवादी की ठाकरे भाजपसोबत कोण जाणार?

आणखी वेळ गेल्यास अजित पवार भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतात अशी भीती महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला वाटू शकते. कारण राष्ट्रवादीची शिवसेनेशी युती होऊ शकते तर भाजपसोबत का नाही? असा युक्तिवाद अजित पवार सहज करून भाजपसोबत जाऊ शकतात. शिवाय अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. शिवाय ईडी आणि सीबीआयची टांगती तलवार असलेल्या पक्षातील नेत्यांना सुरक्षित करण्यासाठी देखील अजित पवार वेगळा निर्णय घेऊ शकतात.

पवारांच्या राजीनाम्याचा भाजपला फायदा...?

शरद पवार यांनी 2024 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे भाजपसाठी फायदेशीर मानले जात आहे. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानतंतर शरद पवार निर्णय प्रक्रियेत कितपत सक्रिय राहतील हा मोठा प्रश्न आहे. शरद पवारांच्या सक्रिय राजकारणातून एक पाऊल मागे जाण्याने भाजपसाठी महाराष्ट्र जिंकणं सोपं होऊ शकतं. देशाच्या राजकारणात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. कारण उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात भाजप आपली ताकद मजबूत करून लोकसभेचा किल्ला अभेद्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या राजानाम्यामुळे राज्यातील विरोधी पक्ष विस्कळीत होऊन त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता जास्त आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com