Shocking Video: फिल्मी स्टाइलमध्ये हायटेक चोरी; धावत्या ट्रकमधून फेकल्या बकऱ्या, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

बॉलिवूड किंवा हॉलिवूड चित्रपटात आपण अजब चोरीचा प्रकार तुम्ही पाहिले असतील. असाच काहीसा प्रकार आता प्रत्यक्षात समोर आला आहे.
Shocking Video
Shocking VideoSaam Tv
Published On

Shocking Viral Video: आजपर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील पण सध्या सोशल मीडियावर बकऱ्या चोरीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क व्हाल. बॉलिवूड किंवा हॉलिवूड चित्रपटात आपण अजब चोरीचा प्रकार तुम्ही पाहिले असतील. असाच काहीसा प्रकार आता प्रत्यक्षात समोर आला आहे. ज्यामध्ये चोरटे महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकमधून बकऱ्या फेकताना दिसत आहेत. (Latest Marathi News)

Shocking Video
Amravati News : अमरावती मध्यवर्ती बसस्थानक व्यवस्थापकाची आत्महत्या, पाेलिस तपास सुरु

बकऱ्या चोरीचा व्हायरल व्हिडिओ

हा व्हायरल व्हिडिओ (Viral News) कानपूर-लखनऊ हायवेवरील असल्याचा दावा केला जात आहे. तर बकऱ्या चोरणाऱ्या चोरट्यांचे कृत्य पाहून अनेकांना धक्का बसला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक ट्रक भरधाव वेगाने धावताना दिसत आहे. यावेळी ट्रकवर एक व्यक्ती उभा असल्याचे दिसून येत आहे.

हा व्यक्ती ट्रकमध्ये असलेल्या बकऱ्या एक एक करून थेट हायवेवर फेकत आहे. तसेच ट्रकच्या पाठीमागे एक कारही असल्याचे दिसून येत आहे.अनेक बकऱ्या रस्त्यावर फेकल्यानंतर तो तरुण चतुराईने ट्रकमधून उतरतो. (Viral Video)

लोकांच्या प्रतिक्रिया

चालत्या ट्रकमध्ये या चोरीचा व्हिडीओ (Video) कोणीतरी रेकॉर्ड केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, या चोरांना अशी चोरी करण्याची कल्पना कुठून आली? या चोरांनी हॉलिवूड चित्रपटातून ही कल्पना चोरली आहे का? असे प्रश्न सोशल मीडियावर युजर्स विचारत आहे.

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “लखनऊ-कानपूर राष्ट्रीय महामार्गादरम्यान शेळ्या लुटल्या, मुक्या प्राण्यांसोबत हा अत्याचार का?” तर दुसऱ्याने लिहिलं, “हद्द झाली आहे, आपला देश पाकिस्तान बनायला लागला आहे, पोलीस फक्त वसुलीच्या कामावर आहेत का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हा व्हिडीओ कधीचा आहे याची माहिती नाही

हा व्हिडीओ @vishnutiwariKNP नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “ही कोणत्या सिनेमातील दृश्य नाही, कानपूर-लखनऊ हायवेवर धावत्या ट्रकमधून शेळ्यांची चोरी होत आहे.” मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com