Woman Marries Son’s Friend, Pregnancy at 50 Shocks Netizens x
देश विदेश

Viral News : अजबच! महिलेने मुलाच्या मित्राशी केलं लग्न, वयाच्या ५० व्या वर्षी राहिली गर्भवती

Viral : एका महिलेने तिच्या मुलाच्या मित्राशी लग्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलाच्या आग्रहाने महिलेने लग्न करण्याचा निर्णय घेतला. महिला गर्भवती राहिल्याच्या बातमीने परिसरात खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

50 Year Old Woman Marries Son’s Friend : आजकाल नातेसंबंध इतके गुंतागुंतीचे झाले आहेत की, त्यांना समजून घेणे कठीण झाले आहे. कोण सासूबरोबर लग्न करत आहे, कोणी सासऱ्यासोबत पळून जात आहे, तर कोणी लग्न केल्यानंतर प्रियकर/ प्रेयसीसह पळून जात आहे. अशीच एक विचित्र प्रेमकथा समोर आली आहे. एका ५० वर्षीय महिलेने तिच्या मुलाच्या मित्राशी लग्न केले आहे. महिलेच्या गरोदरपणाच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

हे प्रकरण चीनमधले आहे. ५० वर्षीय महिला सिस्टर शिन म्हणून प्रसिद्ध आहे. ती ग्वांगझूमध्ये ई-कॉमर्स व्यवसाय करते. या महिलेने वयाच्या ३० व्या वर्षी तिच्या पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. घटस्फोट झाल्यानंतर या महिलेने दोन्ही मुलांना वाढवले.

एससीएमपीच्या अहवालानुसार, सहा वर्षांपूर्वी सिस्टर शिनच्या मुलाने, कैकाईने त्याच्या तीन परदेशी मित्रांना न्यू इयरच्या डिनर पार्टीसाठी आमंत्रित केले होते. तेव्हा डेफू हा कैकाईचा रशियन मित्र पार्टीला आला होता. डेफू हा कैकाईपेक्षा एका वर्षाने मोठा होता. चीनमध्ये अनेक वर्ष राहिल्याने डेफू चिनी भाषा बोलण्यात पारंगत झाला होता. सिस्टर शिन यांच्या चांगल्या वागणूकीमुळे डेफूने त्याचा एका दिवसाचा मुक्काम आठवडाभरासाठी वाढवला.

'न्यू इयर पार्टीनंतर डेफूने मला फोन केला. तो मला अनेक भेटवस्तू पाठवत राहिला. दोघांच्या वयामध्ये २० वर्षांपेक्षा जास्त फरक असतानाही डेफूने मला प्रपोज केले. सुरुवातीला मी नकार दिला. पण मुलाच्या, कैकाईच्या आग्रहावरुन मी डेफूच्या मागणीला होकार दिला आणि आम्ही लग्न केले', अशी माहिती सिस्टर शिन यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी सिस्टर शिन यांनी एका व्हिडीओद्वारे गरोदर असल्याची घोषणा केली. वयाच्या ५० व्या वर्षी गर्भवती राहिल्याने सिस्टर शिन यांच्या प्रेमकथेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही लोकांनी त्यांचे समर्थन केले आहे, तर काहीजणांनी सिस्टर शिन यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT