Viral Video : मी मुसलमान, यांचं काय.. हे दगडाच्या समोर पूजा करणारे लोक..; मूर्तीपूजेवर टीका करणाऱ्या व्यक्तीला अटक

Hyderabad News : हैदराबादमध्ये एका मुस्लिम व्यक्तीने मूर्तीपूजेवर टीका केल्यामुळे तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. त्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral Videox
Published On

Hyderabad Viral Video : हैदराबादमधील नारायणगुडा भागात एका मुस्लिम व्यक्तीचा हिंदू देवता आणि मूर्तीपूजेबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शनिवारी (२८ जून) रोजी या व्यक्तीवर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणामुळे परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. एका हॉटेलसमोर या व्यक्तीने गोंधळ घातला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video
Ajit Pawar : अशी वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न, ठाकरे बंधूंच्या एकीआधीच महायुतीचा मास्टरस्ट्रोक; अजित पवार म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या बिलावरुन या वादाला सुरुवात झाली. मुस्लिम व्यक्तीने दुसऱ्या ग्राहकाशी भांडायला सुरुवात केली. 'मी ४५० रुपये दिले. आता मला १४० रुपये परत मिळायला हवेत. मी मुस्लिम आहे आणि माझ्या श्रद्धेवर मला ठाम विश्वास आहे. हे दगडाच्या समोर पूजा करणारे लोक...' असे मुस्लिम व्यक्तीने म्हटल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

हिंदू देवता आणि मूर्तीपूजनाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्या ठिकाणी लगेचच तणाव वाढला. तेथे उपस्थित लोक त्या मुस्लिम व्यक्तीला धक्काबुक्की करायला लागले. काही त्या व्यक्तीला मारहाण देखील केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले. व्हायरल व्हिडीओमधील व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.

Viral Video
धक्कादायक! फलंदाजी करताना जोरदार फटका मारला, क्रिकेटच्या मैदानातच खेळाडूला मृत्यूनं गाठलं, पाहा व्हिडिओ

भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०२ (धार्मिक भावना दुखावणे), कलम १९६ (धार्मिक तेढ निर्माण करणे), कलम ३५१ (धमकी देणे) यांच्या अंतर्गत मुस्लिम व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक देखील करण्यात आली आहे. तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी शांतता राखण्याचे आणि सोशल मीडियावर प्रक्षोभक मजकूर टाकणे टाळण्याचे आवाहन हैदराबाद पोलिसांनी केले आहे.

Viral Video
Nanded Crime: २० वर्षांपासून बायकोकडून छळ, संयम संपलेल्या नवऱ्याने नदीत उडी मारली, शेवटच्या चिठ्ठीत धक्कादायक माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com