Indian Railway Food : ७ पुऱ्या, भाजी अन् लोणचं; रेल्वे प्रवासात फक्त १५ रुपयात पोटभर जेवण

IRCTC News: भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी फक्त १५ रुपयांत ७ पुऱ्या भाजी आणि लोणचं अशापद्धतीच 'जनता खाना' सुरु केला आहे. या जेवणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Indian Railway Food
Indian RailwaySaam Tv
Published On

भारतीय रेल्वेमधील स्वस्त जेवण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे जेवण फक्त १५ रुपयांमध्ये भारतीय रेल्वेने सुरु केलं आहे. मात्र या जेवणावर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही पद्धतीने टीका होत आहेत. या जेवणाला भारतीय रेल्वेने 'जनता खाना' नाव दिले आहे.

भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉरपरेशनने गेल्या वर्षी भारतीय रेल्वेच्या सहकार्याने विशेषतः सामान्य श्रेणीच्या डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी परवडणारा 'जनता खाना' सादर केला आहे. कमी किंमतीमध्ये स्वछ आणि पोटभर जेवण उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्धेश आहे. या १५ रुपयांच्या जेवणात सात पुऱ्या भाजी आणि लोणच मिळत. आणि त्याचसोबत प्रवाशांना ३०० मिली पाण्याची बॉटल देखील मिळते. अनेक प्रवासी या जेवणाचा आस्वाद घेतात. तर काहींना हे जेवण आवडत नाही.

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर एका प्रवाशाने शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने प्रवासादरम्यान घेतलेल्या जेवण दाखवले आहे. या जेवणात सात पुऱ्यांचा समावेश आहे. पुऱ्यांसोबत भाजी आणि लोणच देखील आहे. प्रवाशाने या जेवणाची स्थुती केली आहे. तर त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओ वर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी टीकासुद्धा केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याला ८ लाखाहून जास्त वापरकर्त्यांनी बघून शेअर केले आहे.

Indian Railway Food
Indian Railway: तिकीटाचे दर, तत्काळ बुकिंग, आता वेटिंग; रेल्वेच्या नियमात ५ मोठे बदल

या व्हिडिओवर प्रवाशांची प्रतिक्रिया काय ?

एका सोशल मीडिया वापरकर्त्याने त्या व्हिडिओवर म्हटले आहे की, "खरं सांगायचं तर या किमतीत छान दिसतंय, प्रत्येक रेल्वे स्टेशनवर उपलब्ध असायला हवं," तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे की, "फक्त ₹ १५ मध्ये पूर्ण जेवण - आता सार्वजनिक सेवा अशी दिसायला हवी! जनता खाना ही एक छोटी किंमत आहे ज्याचा मोठा परिणाम होतो, ज्यामुळे प्रवासात कोणीही उपाशी राहणार नाही. भारतीय रेल्वेला थाळीत प्रतिष्ठा दिल्याबद्दल धन्यवाद,"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com