Indian Railway: तिकीटाचे दर, तत्काळ बुकिंग, आता वेटिंग; रेल्वेच्या नियमात ५ मोठे बदल

indian Railway Latest Rules: रेल्वेने बरेच काही बदलले आहे. रेल्वेने अनेक मोठे बदल केले आहेत. तत्काळ तिकिटांपासून ते आरक्षण शुल्कापर्यंत, रेल्वे भाड्यापासून ते वेटिंग तिकिटांपर्यंत, नियम बदलले आहेत.
indian Railway Latest Rules
Indian Railway Saam Tv
Published On

रेल्वेने आपल्या नियमात अनेक मोठे बदल केले आहेत. तत्काळ तिकिटांपासून ते आरक्षण शुल्कापर्यंत, भाड्यापासून ते वेटिंग तिकिटांपर्यंत, या नियमात रेल्वेने मोठे बदलले आहेत. आता रेल्वेने वेटिंग तिकिटांबाबत मोठा बदल केला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बदल केलाय.

रेल्वेने वेटिंग तिकिटांची मर्यादा निश्चित केलीय. नवीन नियमानुसार, आता गाड्यांमध्ये पूर्वीपेक्षा २५% कमी वेटिंग तिकिटे दिली जातील. रेल्वे प्रवासी प्रोफाइल व्यवस्थापन अंतर्गत डेटाचे विश्लेषण केल्यानंतर रेल्वेने हा निर्णय घेतलाय. रेल्वेच्या या निर्णयामुळे केवळ डब्यांमधील गर्दी नियंत्रित होण्यास मदत होणार नाही.

तर वेटिंग तिकिटे कन्फर्म होण्याची शक्यताही वाढणार आहे. रेल्वेच्या निर्णयानुसार, गाड्यामध्ये रद्द करण्याचे प्रमाण जास्त आहे. कमी रद्द होणाऱ्या गाड्यांमध्ये कमी प्रतीक्षा यादी असेल. हा निर्णय कन्फर्म तिकिटे असलेल्या प्रवाशांसाठी सोयीस्कर असेल.

indian Railway Latest Rules
Electricity Bill: किती युनिटपर्यंत किती बिल वाचणार? वीज ग्राहकांना मोठा दिलासा

तत्काळ तिकिटांचे नियम बदलले

रेल्वेने तत्काळ तिकिटांसाठी नियम बदलून आधार अनिवार्य केला आहे. रेल्वेने १ जुलैपासून तत्काळ तिकिट बुकिंगसाठी आधार अनिवार्य केलाय. तुम्हाला प्रथम तुमचे आयआरसीटीसी लॉगिन आधारशी लिंक करावे लागेल.

आधार लिंकशिवाय आयआरसीटीसी खात्यावरून तत्काळ तिकिटे बुक करण्याचे नियम बदलले आहेत. रेल्वे बोर्डाने १ जुलैपासून ट्रेनचं भाडे वाढवण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवलाय. या प्रस्तावानुसार, १ जुलैपासून सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे भाडे वाढण्याची शक्यता आहे. नॉन-एसी कोचचे भाडे प्रति किलोमीटर १ पैशाने आणि एसी कोचचे भाडे प्रति किलोमीटर २ पैशाने वाढू शकतात.

indian Railway Latest Rules
Maharashtra ST Tourism Scheme: राज्यभरात खुशाल फिरा! प्रवास भाडे, जेवण आणि निवासाचं टेन्शन विसरा, काय आहे ST Tourism Scheme

नवीन बदलानुसार, रेल्वेने प्रवासाच्या ४ तासांपूर्वी ऐवजी २४ तास आधी आरक्षण शुल्क देण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वेने असा निर्णय रेल्वे सुटण्याच्या २४ तास आधी आरक्षण शुल्क जारी केले जाईल. असे केल्याने प्रवाशांना प्रवास करणे सोपे होईल. तिकीट एजंटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल केलाय.

१ जुलैपासून एजंटना तत्काळ तिकीट बुक करण्याची वेळ बदलण्यात आलीय. या नवीन नियमांनुसार, बुकिंग एजंट्सकडून एसी क्लाससाठी तत्काळ तिकिटे बुक करण्याची वेळ सकाळी १०.३० वाजेपासून आणि स्लीपर क्लाससाठी सकाळी ११.३० वाजेपासून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com