Supporters celebrate as exit polls predict advantage for ruling parties in Tamil Nadu and Assam elections. saam tv
देश विदेश

Exit Polls: पाच राज्यांपैकी २ राज्यात सत्ताधाऱ्यांचीच सत्ता; एक्झिट पोलनं राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Vidhan Sabha Election Exit Polls: एक्झिट पोलनुसार तामिळनाडू आणि आसाममध्ये वेगळेच चित्र दिसत आहे. येथील सत्तेत असलेले पक्ष आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होतील असा अंदाज आहे.

Bharat Jadhav

  • एक्झिट पोलमध्ये दोन राज्यांत सत्ताधाऱ्यांना स्पष्ट आघाडी

  • तामिळनाडूमध्ये डीएमके+ आघाडी मजबूत स्थितीत

  • आसाममध्ये भाजप सरकार पुनरागमनाच्या मार्गावर

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यातील दोन राज्यातील एक्झिट पोलने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. आसाम आणि तमिळनाडूमधील सत्ताधाऱ्यांची सत्ता कायम राहणार आहे. मॅट्रिझ एक्झिट पोलने तामिळनाडूच्या राजकीय पटलावर खळबळ उडवून दिली आहे. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, सत्ताधारी डीएमके+ आघाडी पुन्हा एकदा बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याच्या मजबूत स्थितीत दिसत आहे.

तर एआयएडीएमके+ आघाडीत अटीतटीची लढत असणार आहे. तर आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा यांचे सरकार येणार आहे. तामिळनाडू विधानसभेत एकूण २३४ जागा आहेत. बहुमतासाठी बहुमताचा आकडा ११८ आहे. एक्झिट पोलनुसार, डीएमके+ आघाडी हा आकडा सहजपणे गाठू शकणार आहे. तर एआयएडीएमके+ ला अजूनही सुमारे १०० जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

मॅट्रिस एक्झिट पोलमधील प्रमुख आकडेवारी:

डीएमके+ — १२२ ते १३२ जागा, मतांचा वाटा ४०.३ १टक्के

एआयएडीएमके+ — ८७ ते १०० जागा, मतांचा वाटा ३७.१ १टक्के

टीव्हीके (विजय यांचा पक्ष) — १० ते १२ जागा, मतांचा वाटा १७.५ १टक्के

इतर — ० ते ६ जागा, मतांचा वाटा ५.१टक्के

मतांच्या बाबतीत डीएमकेची कामगिरी देखील काहीशी चांगली आहे. जर एआयएडीएमके+ केवळ ३.२ टक्के मतांसह मागे आहे. यामुळे येथील लढत अधिक चुरशीची ठरत आहे. TVK ने पहिल्यांदाच विधान सभा निवडणूक लढवत आहे. पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या टीव्हीके ला १७.५ टक्के मते मिळवली आहेत. यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. तर टीव्हीके मिळालेल्या मतांच्या टक्केवारीमुळे एआयएडीएमके+ साठी अत्यंत नुकसान होण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलनुसार, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन सलग दुसऱ्यांदा सत्तेवर परत येऊ शकतात. डीएमके+ ला मागील निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज आहे, पण तरीही ते सत्ता टिकवण्यात यशस्वी होतील असा अंदाज आहे. दुसरीकडे एआयएडीएमके+ ला आशा होती की सत्ताविरोधी मतांचा त्यांना फायदा होईल, परंतु टीव्हीकेच्या उदयामुळे त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.

आसामध्ये सत्ताधारीच सत्ता असणार

२०२६ च्या आसाम विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट आघाडी मिळताना दिसत आहे. बहुतेक एजन्सींनी भाजपला बहुमताचा आकडा मिळेल असा दावा केला आहे. एनडीएला ६४ पेक्षा जास्त मिळू शकतात. म्हणजेच ८५ ते १०० जागा मिळतील एनडीएला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ॲक्सिस माय इंडिया, मॅट्रिझ आणि व्होटव्हाइब यांसारख्या पोलमध्ये भाजप मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. दरम्यान काँग्रेस आघाडीला २३ ते ३६ जागा मिळतील, असा अंदाज आहे. इतर पक्षांना ० ते १२ जागा मिळतील असा अंदाज आहे. या आकडेवारीवरून भाजप आसाममध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते. तर विरोधी पक्ष कमकुवत स्थितीत येणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान एक्झिट पोल हे केवळ कल दर्शवतात, खरे निकाल ४ मे २०२६ रोजी कळतील. दिल्लीच्या राजकीय वर्तुळापासून ते आसामच्या गल्लींपर्यंत कोणाचे पारडे जड आहे हे एक्झिट पोलच्या आकडेवारीवरूनच ठरत आहे. AXIS My India च्या एक्झिट पोलमधून आसामच्या मुख्यमंत्रीपदासाठी मतदारांची पसंतीही समोर आली आहे. या अंदाजानुसार विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना सर्वाधिक पाठिंबा मिळताना दिसत आहे. सुमारे ४८ टक्के मतदारांनी त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी आपली पहिली पसंती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

EPFO Update: बंद PF खात्याबाबत मोठी अपडेट! EPFO सुरु करणार नवी सुविधा, जाणून घ्या प्रक्रिया...

मोठी बातमी! महाविकासआघाडी फुटली? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Pune Accident: वाय-फाय केबलमुळं ५० वर्षीय महिलेचा मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT