Jagdeep Dhankhar Saam Tv
देश विदेश

Jagdeep Dhankhar: मोठी बातमी! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली, एम्समध्ये उपचार सुरू

Jagdeep Dhankhar Health Issue: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती अचानक खालावली. रविवारी सकाळी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Priya More

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली. मध्यरात्री छातीत दुखत असल्यामुळे आणि अस्वस्त वाटत असल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. एम्स रुग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना मध्यरात्री अस्वस्थता आणि छातीत दुखण्यासारखे वाटत होते. या तक्रारीनंतर ताबडतोब त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ७३ वर्षीय धनखड यांना मध्यरात्री २ च्या सुमारास रुग्णालयात नेण्यात आले.

एम्समधील कार्डिओलॉजी प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली धनखड यांना क्रिटिकल केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनखड यांची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजप प्रमुख जेपी नड्डा यांनी उपराष्ट्रपती धनखड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्सल रुग्णालयाला भेट दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणात भूकंप! मध्यरात्री भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Black Dark Skin Care Tips: सावळ्या त्वचेसाठी 5 सोपे घरगुती उपाय

Viral Video: शॉपिंगसाठी ५ जणी एकत्र आल्या, एकीनं दुकानदाराला गप्पा मारण्यात गुंतवलं, चौघींनी साडीत जिन्स लपवून पळवल्या; CCTV व्हायरल

Maharashtra Politics : माझ्यासारखे २४२ आमदार आहेत, म्हणून तुझा मुख्यमंत्री, शिंदेंसेनेचे आमदाराचे विधान

SCROLL FOR NEXT