Maharashtra Politics: जयंत पाटील यांच्या सूचक विधानाने भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण, नेमके काय म्हणाले?

Jayant Patil: राज्यामध्ये सध्या ऑपरेशन टायगर आणि ओपेरेशन लोटस सुरू आहे. अनेक बड्या नेत्यांचा प्रवेश हा शिवसेना आणि भाजपमध्ये होताना दिसत आहे. यातच आता जयंत पाटील यांनी एक सूचक वक्तव्य केले त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहे.
जयंत पाटील भाजप
जयंत पाटील भाजप saam tv
Published On

पंढरपूर - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर धरत असतानाच, त्यांनी "मी सगळ्यांच्या संपर्कात आहे" असे सूचक विधान करत चर्चांना अधिक बळ दिले आहे.

जयंत पाटील भाजप
Beed Crime : रक्षकच झाला भक्षक! महिला दिनी पोलीस कर्मचाऱ्यानेच केला बलात्कार, बीड हादरलं

गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील पक्षांतर्गत नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अलीकडेच त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "जयंत पाटील माझं ऐकत नाहीत" अशी मिश्कील टिप्पणी केल्यानंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली.

जयंत पाटील भाजप
Ladki Bahin Yojana: लाडकी बहि‍णींच्या खात्यात फक्त १५००? मार्चचा हप्ता कधी मिळणार?

आज अकलूज येथे भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी आले असताना, माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी "मी सगळ्यांच्या संपर्कात आहे" असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com