Maharashtra Politics: "कोणी अंगावर आला, तर डायरेक्ट ठोका" संजय राऊत यांची घणाघाती गर्जना

Sanjay Raut Attack On BJP : आज ठाकरेसेनेच निर्धार शिबिर मुंबई येथे पार पडले. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला.
sanjay raut slam on bjp
sanjay raut slam on bjpsaam tv
Published On

ओमकार सोनवणे, साम टीव्ही

मुंबई: "आता आदेशाची वाट पाहायची नाही, आला अंगावर की डायरेक्ट ठोकायचा, तरच मुंबई आणि महाराष्ट्र वाचेल," अशी घणाघाती गर्जना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. मुंबईत पार पडलेल्या निर्धार शिबिरात त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवत आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांना संघर्षाची हाक दिली.

sanjay raut slam on bjp
Uddhav Thackeray : तुम्ही 'उद्धव ठाकरे' होऊच शकत नाही; ठाकरे फडणवीसांवर कडाडले, नेमकं काय म्हणाले? VIDEO

शिबिरात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्याआधी संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करत भाजपचे हिंदुत्व 'फेक' असल्याचा आरोप केला. "भाजपचे सर्वात मोठे फेक म्हणजे हिंदुत्ववादी असण्याचा दावा असा घणाघाती आरोप करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

राऊत म्हणाले, आम्हाला काँग्रेससोबत गेल्याचा आरोप करणारे भाजपवाले स्वतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते गोळा करत आहेत. त्यांनी अशोक चव्हाण, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांची उदाहरणे देत भाजपवर निशाणा साधला. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसच्या नेत्यांनी भाग घेतला, तेव्हा भाजप कुठे होते? असा सवालही त्यांनी केला

sanjay raut slam on bjp
Raj Thackeray: गंगेचं पाणी! हड मी नाही पिणार; राज ठाकरेंकडून कुंभस्नानाची खिल्ली

"फटे लेकिन हटे नही!

राऊत यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी विचारले, शिवसेना कोणती जडीबुटी खाते? एवढे हल्ले होऊनही तुम्ही ठाम उभे राहता त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, आमचा एकच मंत्र आहे. फटे लेकिन हटे नही

राऊत यांनी विधानसभा निवडणुकीतील निकालावरही भाष्य केले. भाजप घोटाळे करून निवडणुका जिंकते. EVM घोटाळा झाल्यामुळे आम्ही हरलो. राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि आम्ही पत्रकार परिषदेत हे उघड केले. अरविंद केजरीवाल यांना आम्ही भेटायला गेलो होतो त्यावेळेस ते हताश होऊन बसले होते. तेव्हा आम्ही त्यांना विचारले की पराभव कस काय झाला त्यावेळेस त्यांनी सांगितले की स्वतःच्या मतदारसंघातील 21,000 मते कधी गायब झाली, आणि 31000 हजार मत कसे काय वाढली हे त्यांनाही कळले नाही, असे सांगत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप लावला.

sanjay raut slam on bjp
अजितदादा आम्हाला न्याय द्या...; तुमच्या एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय, अश्रूंच्या धारांसह वैभवीची आर्त हाक

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या लाखो बोगस मतांचा पर्दाफाश

पुढे संजय राऊत म्हणाले मी ममता बॅनर्जी यांचा खास अभिनंदन करतो कारण पुढच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक आहे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ते तिथे कामाला लावले आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये भाजप कसे जिंकली याचा त्यांनी अभ्यास केला आहे. कारण त्यांना खात्री होती की महाराष्ट्र मध्ये शिवसेनेची सत्ता येणार आहे आणि दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सत्तेवर येत आहे. ममता बॅनर्जीच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस त्यांना असं सापडले की महाराष्ट्रात जो प्रयोग झाला आणि हरियाणामध्ये प्रवेश झाला. तसाच प्रयोग पश्चिम बंगालमध्ये देखील भाजप करत आहे त्यामध्ये त्यांना दहा लाख बोगस मतदान सापडले आहेत. एकाच युनिक कोडचे मतदान बिहार झारखंडमध्ये सापडत आहे असे कसे शक्य आहे हे सगळे लोक आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी पकडले आहे याबाबत निवडणूक आयोगाने देखील चूक मान्य केली.

पुढे राऊत यांनी घणाघाती गर्जना करत म्हणाले, महापालिका निवडणुका लढताना डोळ्यात तेल घालून काम करा. कोणी अंगावर आले, तर त्याला डायरेक्ट ठोका तरच महाराष्ट्र आणि मराठी वाचेल . आता हे विधान निवडणुकीच्या रणांगणात काय उलथापालथ घडवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com