
मयूर राणे, साम टीव्ही
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतील निर्धार मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. राज्यालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना, 'कोणत्याही विकास प्रकल्पांना मी स्थगिती देत नाही, कारण मी उद्धव ठाकरे नाही, असं म्हणत फडणवीसांना ठाकरेंवर टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. 'तुम्ही 'उद्धव ठाकरे' होऊच शकत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
ते मला विचारतात, डुबकी मारायला गेले नाहीत. मी सांगितले होते, मोहन भागवत गेले की, मी तिथेच जाणार आणि डुबकी मारणार. पण ते पण गेले नाहीत, मग मी पण गेलो नाही. दोन दिवसांपूर्वी अनाजीपंत जोशी येऊन गेले. घाटकोपरची भाषा मराठी नाही. अहो, मुंबई तुमच्या बापाने दिली नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी काही उद्धव ठाकरे नाही. अहो तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही. ठामपणे कामाला स्थगिती देण्यासाठी उद्धव ठाकरे हवा, तुम्हाला जमणार नाही. इतकेच आहे, तर उद्या शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती जाहीर करा. माता भगिनींना २१०० रुपये जाहीर करून दाखवा. मी कोणत्या कामाला स्थगिती दिली?
हे लोक भाषावाद करत आहेत. मराठी माणूसच मराठी माणसाचा घात करतो. कधीतरी आपण आपली प्रवृत्ती सोडून पुढे जाणार की नाही? शिवसेना प्रमुखांनी सांगितले होते, महाराष्ट्रात मी मराठी आहे. देशात मी हिंदू आहे, ही आमची व्याख्या आहे. आज तुम्ही नासवून टाकत आहेत.
आम्हाला भाजप मुक्त राम पाहिजे. राज्य तर मी आणणारच. असं मी सोडणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे देऊळ उभारू. आम्ही जय श्री राम बोलू पण, तुम्हाला देखील जय शिवाजी महाराज बोलायला लावू. तुम्ही आता दैवतावरून भांडण लावायला निघाले. आजपर्यंत मुंबईत आलेल्या संकटात शिवसैनिक उतरला होता. गोमूत्र घेऊन बसला नव्हता.
मराठी साहित्य संमेलनात मराठी गीत मुस्लिम मुलीने गायले. मुंबई मुक्तीचा लढा सांगणारा अमर शेख आमचा होता. तो जन संघीय नव्हता. साबीर शेख देखील होता. मोहन भागवत मशिदीत जातात. पण अजून उद्धव गेला नाही. नरेंद्र मोदी यांना मुस्लिम बटाट्याची भाजी आणि पुऱ्या बनवून द्यायचे. ताजिया मध्ये जायचे. तरी तुम्ही हिंदू, पण आम्हाला बोलणार. त्यांना वन नेशन वन इलेक्शन पाहिजे. त्यांना सगळं एक एक हवं. आम्हाला तुमचे विधान मान्य नाही. बाबासाहेबांचे संविधान आम्हाला मान्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.