अजितदादा आम्हाला न्याय द्या...; तुमच्या एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय, अश्रूंच्या धारांसह वैभवीची आर्त हाक

Vaibhavi Deshmukh : अजितदादा..माझे वडील गेले आहेत, आम्ही न्याय मागतोय. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करा. तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे आज राज्य नासत चाललंय.
Baramati Santosh Deshmukh daughter Vaibhavi
Baramati Santosh Deshmukh daughter VaibhaviSaam Tv News
Published On

मंगेश कचरे, साम टिव्ही

पुणे (बारामती) : बीडमधील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने आज रविवारी बारामतीमध्ये झालेल्या आक्रोश मोर्चानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना वैभवीने आर्त हाक देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

वैभवी म्हणाली, अजितदादा..माझे वडील गेले आहेत, आम्ही न्याय मागतोय. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करा. तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे आज राज्य नासत चाललंय. ते जे करत आहेत त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना जगणं मुश्किल होत चाललं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे मी न्यायाची मागणी करते. आमच्या भागात अनेक गंभीर प्रकरणं घडली आहेत, त्याचीही सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वैभवीने यावेळी केली.

Baramati Santosh Deshmukh daughter Vaibhavi
Uddhav Thackeray : अहो, तुमच्या बापाने मुंबई दिली नाही; उद्धव ठाकरेंकडून भय्याजी जोशींचा समाचार

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत वैभवी देशमुख म्हणाली, आमची पहिल्यापासूनच एकच भूमिका आहे ती म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. खंडणीमुळे माझ्या वडिलांची हत्या झाली. ती खंडणी नेमकी कोणाकडे जाते, हा सुद्धा आम्हाला पडलेला एक प्रश्न आहे. माझ्या वडिलांसंबंधी घटना घडलेली असताना जिल्ह्यात अजूनही काही घटना घडत आहेत. वडिलांच्या हत्येचे जे फोटो व्हायरल केले जात आहेत, त्यात मृतदेह समोर असतानाही आरोपी कसा अमानुष छळ करत आहेत, हे दिसून येते. या मागे निश्चित कोणाचा तरी हात, मोठा पाठींबा आहे. आज तीन महिने झाले महाराष्ट्र न्यायासाठी आस लावून बसला आहे, अशी आर्त हाक वैभवी देशमुख हिने दिली आहे.

Baramati Santosh Deshmukh daughter Vaibhavi
चालत्या रेल्वेतून उतरताना पाय घसरला, प्लॅटफॉर्म-रेल्वेच्या मधोमध महिला अडकली, तेवढ्यात...; थरारक Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com